तालुक्यातील विविध सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा इंद्रायणी भात थेट खरेदी करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी (दिनांक 11 नोव्हेंबर) रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत कामशेत येथे करण्यात आला. खास बाब म्हणजे यावेळी स्वतः अजित पवार यांनी दोन पोती खरेदी करत माऊली दाभाडे यांना रोख पैसे देऊन भात खरेदीचा शुभारंभ केला. ( Launch of Indrayani Rice Paddy Purchase Initiative By Ajit Pawar at Kamshet Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“मावळ तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. शेतीबरोबरच पर्यटन, दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री आदी व्यावसायात तरुण येत आहे. त्यांनी चांगल्या प्रकारे व्यवसाय करावा. त्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक कर्ज योजना आहेत, त्याचा लाभ घ्यावा. मावळातील इंद्रायणी भात हा एक चांगला ब्रँड करुन मार्केटिंगसाठी भिमथडी, पवनाथडी जत्रा यांसारख्या ठिकाणी स्टॉल लावावेत. शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करावेत. तसेच गुणवत्तेला प्राधान्य द्यावे,” असे मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला अजित पवार यांच्यासह, मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा दिगंबर दुर्गाडे, माऊली दाभाडे, गणेश खांडगे, सचिन घोटकुले, रमेश साळवे, बबनराव भेगडे यांच्यासह सहकार, कृषी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, आजी-माजी पदाधिकारी, मावळमधील सोसायटी चेअरमन, सचिव, सदस्य, पीडीसीसी बँक अधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– व्हिडिओ: अजित पवारांनी स्वतः सांगितलं 7 दिवस गायब होण्यापाठीमागचं कारण, सर्वांचेच गैरसमज केले दूर
– व्हिडिओ : जेव्हा शरद पवार डॉक्टरांना म्हणाले, ‘तुम्हाला पोहोचवल्यावरच मी जाणार..’, अजित पवारांनी सांगितला तो किस्सा