आजकाल मुले मोबाईलच्या प्रचंड आहारी गेल्याचे दिसतात. त्यामुळे मोबाईल या कारणामुळे अनेक छोट-मोठे गुन्हे किंवा अपघात घडताना दिसतात. शालेय जीवनात अभ्यास, मित्र, संवाद या गोष्टी प्रचंड महत्वाच्या असतात. मात्र, मोबाईल ही गोष्ट या सर्व बाबतीत अडथळा बनताना दिसत आहे. ऑनलाईन अभ्यास ही काळाची गरज असली तरीही मोबाईलचे दुष्परिणाम देखील प्रचंड प्रमाणात दिसून येत आहेत.
अगदी अशाच पद्धतीचा प्रत्यय लोणावळा ( Lonavala ) येथे गुरुवारी (15 सप्टेंबर) रोजी आला. मोबाईलमध्ये इन्स्टंट मेसेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअॅप अॅपवरील एका ग्रुपमध्ये घेतले नाही म्हणून लोणावळ्यातील प्रसिद्ध व्हीपीएस हायस्कूल ( VPS High School ) बाहेर विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हाणामारी ( Quarrel Among Students ) झाली. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद ( Video Viral ) झाला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
व्हॉट्सअॅप अॅपवरील ग्रुपमध्ये घेतले नाही म्हणून व्हीपीएस शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचे दोन गट एकमेकांस भिडले. त्यांच्यात अगदी फिल्मी स्टाईल राडा झाला. सुरुवातीला अगदी खालच्या पातळीची शिवीगाळ सुरु झाली. यातून वाद शिगेला पोहोचला अन् त्यानंतर हे तरुण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण सुरु झाली. परिसरातील वातावरण तणावपूर्ण होऊ लागल्याने उपस्थितांनी दोन्ही गटाला बाजूला केले.
विज्ञान शाप की वरदान, हा विषय निबंधासाठी किंवा चर्चेसाठी पुढे येतो, तेव्हा त्यावर विस्तृत बोललं जातं. मोबाईल हे विज्ञानाचे सर्वात मोठे देणं. पण या मोबाईलला आजच्या काळात वरदाना बरोबरीने शापाचे स्वरुप प्राप्त होताना दिसत आहे. ( Lonavala VPS High School Quarrel Among Students Video Viral )
अधिक वाचा –
व्हिडिओ : ‘अजूनही वेळ गेलेली नाही’, आमदार सुनिल शेळके यांचे निषेध मोर्चात दमदार भाषण
Video : पुण्याजवळील या गावात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये दहशत
Video : आमदार सुनिल शेळकेंच्या प्रयत्नातून नाणे मावळातील बुधवडी गावातील अंधार दुर