व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमध्ये साधेपणाने मात्र उत्साहात बैलपोळा साजरा; शिळींब गावातील बैलांची सजावट ठरली आकर्षणाचा केंद्र

शासनाच्या आदेशानुसार मावळ तालुक्यात गावोगावी अगदी साधेपणाने परंतू उत्साहात बैल पोळा हा शेतकऱ्यांसाठी दसरा-दिवाळी असलेला सण साजरा झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 25, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
Bail-Pola-Festival-2022

Bail Pola Festival Maval Taluka 2022


लम्फी स्कीन ( Lumpy skin disease ) या चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाच्या आदेशानुसार मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) गावोगावी अगदी साधेपणाने परंतू उत्साहात बैल पोळा ( Bail Pola Festival ) हा शेतकऱ्यांसाठी ( Farmer ) दसरा-दिवाळी असलेला सण साजरा झाला. पवनमावळमधील ( Pavan Maval ) शिळींब गावातही ( Shilimb Village ) बळीराजांनी मोठ्या आनंदात बैल पोळ्याचा सण साजरा केला. ( Bail Pola Festival Celebrated With Enthusiasm And Joy )

प्रथा परंपरेप्रमाणे पोळ्याच्या दिवशी बैलांना कोणत्याही प्रकारचे काम लावले जात नाही की, त्यांना नांगराला जुपले जात नाही. आजचा दिवस हा जसा बैलांसाठी आरामाचा तसाच शेतकऱ्यांनी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. बैलांना आज अंघोळ घालून नंतर त्यांच्या शिंगावर, अंगावर रंगोरंगोटी करण्याची पद्धत आहे. त्यानंतर प्रत्येक शेतकरी त्याच्याकडे असलेल्या सजावटीच्या साहित्यांप्रमाणे बैलांची सजावट करतो. त्यानंतर बैलांना ओवाळले जाते आणि पुरणपोळी खाऊ घातली जाते. त्यानंतर गावातील सर्व बैल एकत्र आणून त्यांची मिरवणूक काढली जाते, अनेकदा झोंबी देखील होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

परंतू, यंदा शासकीय नियमाप्रमाणे ( Lumpy skin disease Maval Taluka ) शिळींब गावात शेतकऱ्यांनी बैल मिरवणूकीसाठी एकत्र आणणे टाळले. मात्र, बळीराजाने लाडक्या बैलांना सजवण्यात, नटवण्यात आणि त्याला गावदेवाच्या मंदिराभोवती वेढा मारण्याचे चुकवले नाही. शिळींब आणि परिसरात आता प्रत्येक घरात दावण किंवा दावणीला बैलजोडी असल्याचे दिसत नाही. परंतू ज्यांच्याकडे बैलजोडी आहेत असे शेतकरी बैलांना ओवाळून तर ज्यांच्याकडे बैल नाहीत ते मातीचे बैल पुजून बैलपोळा सण साजरा करतात.

हेही वाचा – Video : शेतकऱ्याचा नादखुळा; फायबरच्या का असेना पण बैलांची जंगी मिरवणूक काढलीच! लेझीम, हलगी सर्वकाही

आषाढ, श्रावण किंवा भाद्रपद आणि कार्तिक महिन्याच्या अमावस्येला प्रदेशानुसार बैलपोळा सण साजरा केला जातो. विदर्भ, मराठवाडा भागात श्रावण अमावस्येला बेंदूर साजरा करण्याची परंपरा आहे. कर्नाटक आणि सीमावर्ती गावांतही बेंदूर साजरा करण्याची परंपरा आहे. तथापी श्रावण अमावस्या आणि भाद्रपद अमावस्या या दोन अमावस्या बैलपोळा म्हणून ओळखल्या जातात. मावळ तालुक्यात भाद्रपद अमावस्येला सर्वत्र बैलपोळा सण साजरा केला जातो. ( Lumpy skin disease Maval Taluka Bull Bail Pola Festival Celebrated With Enthusiasm And Joy )

अधिक वाचा –
मावळमध्ये शेतकऱ्याचा कौतुकास्पद उपक्रम! बैल पोळ्याच्या मिरवणूकीचा खर्च टाळून केली मोठी मदत
वडगावच्या जनआक्रोश रॅलीत आदित्य ठाकरेंचे तुफान भाषण! वाचा संपूर्ण भाषण जसेच्या तसे… ‘तरुणांच्या पाठीवर का वार करताय?’


Previous Post

Video : शेतकऱ्याचा नादखुळा; फायबरच्या का असेना पण बैलांची जंगी मिरवणूक काढलीच! लेझीम, हलगी सर्वकाही

Next Post

शारदीय नवरात्रोत्सव : नवरात्रीचे नऊ दिवस आणि नऊ रंग, वाचा त्यांचे महत्व I Shardiya Navratri 2022

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shardiya-Navratri-2022

शारदीय नवरात्रोत्सव : नवरात्रीचे नऊ दिवस आणि नऊ रंग, वाचा त्यांचे महत्व I Shardiya Navratri 2022

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार ; ‘पीएमआरडीए’कडून 67 कोटींचा विकास आराखडा जाहीर

April 9, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर भाविकांना नित्यदर्शनाकरिता दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

April 9, 2026
Important news District Collector orders changes to traffic on major roads in Maval for cycle competition

जगाच्या नकाशावर गेलेली पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचा दुसरा हंगाम ; मावळमधील ‘या’ भागात होणार सायकल स्पर्धा

April 9, 2026
Chandrashekhar-Bawankule

उत्खनन रॉयल्टी माफ, बिगरशेती परवाना प्रक्रिया डिजिटल होणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

April 9, 2026
MPSC

एमपीएससी मुख्य परीक्षा – २०२४ चा निकाल जाहीर ! सोलापूर जिल्ह्यातील विजय लामकाने राज्यात प्रथम

April 9, 2026
Massive fire breaks out at scrap warehouse along old Pune-Mumbai highway in Kamshet Maval

कामशेत येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग ; लाखोंचा माल भस्मसात

April 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.