व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बाळा भेगडे यांनी खरडपट्टी काढलेल्या तहसीलदार बर्गे यांची थेट गडचिरोलीत बदली; तालुक्यात चर्चांना उधाण

बाळा भेगडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असल्यामुळेच बर्गे यांची गडचिरोली येथे बदली झाल्याचे बोलले जात आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 13, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
bala-bhegade-and-madhusudan-barge

Photo Courtesy : Sajjad Shaikh


मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची बदली झाली आहे. तहसीलदार बर्गे यांची थेट गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका तहसीलदार पदी बदली झाली. मात्र त्यांच्या या बदलीमागे मावळचे माजी आमदार आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे कारण असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. याचे कारण म्हणजे, काही महिन्यांपूर्वी बाळा भेगडे यांनी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची काढलेली खरडपट्टी.

nakshtra ads may 2025

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

tata tiago ads may 2025

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी तहसीलदार कार्यालय वडगाव मावळ याठिकाणी अचानक भेट देऊन स्टिंग ऑपरेशन केले होते. यावेळी तहसीलदार कार्यालयात काही एजंटचा हस्तक्षेप होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. सर्व सामान्य नागरिकांना तासन तास बाहेर उभे राहावे लागत असल्यामुळे बाळा भेगडे यांनी तेव्हा तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना चांगलेच धारेवर धरले होते. ( Madhusudan Barge Maval Taluka Tehsildar Transferred To Dhanora of Gadchiroli Due of Bala Bhegade complaint )

सरकारी आकार पडाच्या जमिनी शेतकऱ्यांना न देता उद्योजक आणि एजंट लोकांच्या घशात घालण्याचे काम बर्गे यांच्या कार्यकाळात करण्यात आल्याचा आरोप अनेकदा भाजपाकडून लगावण्यात आला. तसेच जाणीव पूर्वक राजकीय दबावापोटी कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम तहसीलदारांच्या माध्यमातून केले जात होते, असाही आरोप लगावण्यात आला.

त्यामुळे या सर्व त्रासाला कंटाळून अनेक नागरिकांच्या तक्रारी माजी मंत्री बाळा भेगडे यांच्याकडे आल्या होत्या. त्याचा पाठपुरावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असल्यामुळेच बर्गे यांची गडचिरोली येथे बदली झाल्याचे बोलले जात आहे.

अधिक वाचा –
– Breaking! मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची गडचिरोलीत बदली, ‘हे’ असणार नवीन तहसीलदार
– कार्ला ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय!! ‘ते’ बांधकाम 10 दिवसांत काढून घेण्याची नोटीस काढल्यानंतरच उपोषण मागे


dainik maval ads may 2025

Previous Post

मोठी बातमी! मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची गडचिरोलीत बदली, ‘हे’ असणार नवीन तहसीलदार

Next Post

भाऊसाहेब…हे काय केलं तुम्ही?? मावळ तालुक्यात ग्रामविकास अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
bribe

भाऊसाहेब...हे काय केलं तुम्ही?? मावळ तालुक्यात ग्रामविकास अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde

वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

June 1, 2025
Scholarship

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया 15 जूनपासून सुरू होणार

June 1, 2025
Villagers strongly oppose new design of flyover at Malavali railway station Maval

मळवली रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध । Karla News

June 1, 2025
Kamshet Gram Panchayat Maval

कामशेत ग्रामस्थांचा लढा यशस्वी ! ग्रामपंचायतीची तीस टक्के करवाढ अखेर रद्द ; बीडीओंचा आदेश । Kamshet News

June 1, 2025
Ashadhi Wari Palkhi ceremony is approaching When will dehu Palkhi route be repaired

आषाढी वारी पालखी सोहळा तोंडावर ; पालखी मार्गाची दुरूस्ती कधी होणार?

June 1, 2025
Kamshet police seize illegal stock of kerosene in Mundhaware village maval

कामशेत पोलिसांकडून मुंढावरे गावात रॉकेलचा अवैध साठा जप्त । Kamshet News

June 1, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.