Dainik Maval News : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी पंचांशी घातलेल्या हुज्जतीमुळे त्यांना तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. पंचांना लाथ मारणे आणि त्यांच्याशी हुज्जत घातल्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणं पैलवन शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला चांगलंच भोवले आहे. या दोनही पैलवानांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतला आहे. त्यामुळे पुढच्या तीन वर्षांसाठी या दोन्ही पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी ही माहिती दिली.
- यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. उपांत्य सामन्यात पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि शिवीगाळ केली. तर अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत मैदान सोडलं. त्यावेळी त्याने पंचांना शिवीगाळही केली. यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेची एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये या दोनही पैलवानांवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.
तीन वर्षे कुस्ती खेळता येणार नाही
राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम म्हणाले की, “पंचांनी जो निर्णय दिला होता त्याच्याविरोधात पैलवानांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी खिलाडूवृत्तीने खेळायला पाहिजे होतं. त्यांनी पंचांना लाथ मारणे, शिवीगाळ करणे हे चुकीचं कृत्य केलं. त्यामुळेच शिवराज राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाडने पंचांसोबत वाद केला आणि शिवीगाळही केली. हे एका खेळाडूला शोभणारं नाही. त्यालाही तीन वर्षे कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.”
शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली
मॅट विभागामधून महाराष्ट्र केसरीचा उपांत्य फेरीचा सामना सुरू असताना शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांचा कुस्तीचा सामना सुरू असताना एका मिनिटात पृथ्वीराज मोहोळ याने शिवराज राक्षे या चितपट केले होते. मात्र हा निर्णय शिवराज राक्षेला मान्य नसल्याने त्याने पंच दत्तात्रय माने यांच्याशी वाद घालून त्यांना लाथ मारल्याचा प्रकार घडला होता. यावेळी मोठा गोंधळ झाल्याचं दिसून आलं.
महेंद्र गायकवाडची नाराजी
दुसरीकडे, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळला दुसरा गुण दिल्यानंतर त्याविरोधात महेंद्र गायकवाडने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यावेळी त्याने शिवीगाळ केल्याचा आरोप पंचांनी केला. तसेच महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं आणि त्याच्या समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link