व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पंचांना लाथ मारणे, हुज्जत घालणे भोवलं ; पैलवान शिवराज राक्षे, पैलवान महेंद्र गायकवाड तीन वर्षासाठी निलंबित । Maharashtra Kesari 2025

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी पंचांशी घातलेल्या हुज्जतीमुळे त्यांना तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 4, 2025
in महाराष्ट्र
Wrestlers Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी पंचांशी घातलेल्या हुज्जतीमुळे त्यांना तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. पंचांना लाथ मारणे आणि त्यांच्याशी हुज्जत घातल्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणं पैलवन शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला चांगलंच भोवले आहे. या दोनही पैलवानांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतला आहे. त्यामुळे पुढच्या तीन वर्षांसाठी या दोन्ही पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी ही माहिती दिली.

  • यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. उपांत्य सामन्यात पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि शिवीगाळ केली. तर अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत मैदान सोडलं. त्यावेळी त्याने पंचांना शिवीगाळही केली. यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेची एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये या दोनही पैलवानांवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.

तीन वर्षे कुस्ती खेळता येणार नाही
राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम म्हणाले की, “पंचांनी जो निर्णय दिला होता त्याच्याविरोधात पैलवानांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी खिलाडूवृत्तीने खेळायला पाहिजे होतं. त्यांनी पंचांना लाथ मारणे, शिवीगाळ करणे हे चुकीचं कृत्य केलं. त्यामुळेच शिवराज राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाडने पंचांसोबत वाद केला आणि शिवीगाळही केली. हे एका खेळाडूला शोभणारं नाही. त्यालाही तीन वर्षे कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.”

शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली
मॅट विभागामधून महाराष्ट्र केसरीचा उपांत्य फेरीचा सामना सुरू असताना शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांचा कुस्तीचा सामना सुरू असताना एका मिनिटात पृथ्वीराज मोहोळ याने शिवराज राक्षे या चितपट केले होते. मात्र हा निर्णय शिवराज राक्षेला मान्य नसल्याने त्याने पंच दत्तात्रय माने यांच्याशी वाद घालून त्यांना लाथ मारल्याचा प्रकार घडला होता. यावेळी मोठा गोंधळ झाल्याचं दिसून आलं.

महेंद्र गायकवाडची नाराजी
दुसरीकडे, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळला दुसरा गुण दिल्यानंतर त्याविरोधात महेंद्र गायकवाडने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यावेळी त्याने शिवीगाळ केल्याचा आरोप पंचांनी केला. तसेच महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं आणि त्याच्या समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link


Previous Post

आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर 48 तासांत कारवाई करण्याचे निर्देश । Pune News

Next Post

कान्हे गावातील ट्रान्सफॉर्मर चोरीला, दोन महिन्यांत दुसऱ्यांदा ट्रान्सफॉर्मरची चोरी, पाणीपुरवठा खंडीत । Kanhe News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Transformer stolen from Kanhe village

कान्हे गावातील ट्रान्सफॉर्मर चोरीला, दोन महिन्यांत दुसऱ्यांदा ट्रान्सफॉर्मरची चोरी, पाणीपुरवठा खंडीत । Kanhe News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

May 11, 2026
Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

May 11, 2026
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

May 11, 2026
Neelam Gorhe held an administration meeting regarding rape of a minor girl in Pawana Dam area ​​Lonavala

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

May 11, 2026
Sainath Varghade from Ardav Maval has passed 10th exam after 26 years by solving English subject

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

May 10, 2026
Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.