व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

किल्ले लोहगडावर महाशिवरात्र जल्लोषात साजरी! पंचक्रोशीतील नागरिकांनी केलेल्या शिवघोषाने दुमदुमला परिसर

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड घेरेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या तसेच, तळेगाव दाभाडे येथील कार्यकर्त्यांच्या वतीने परंपरागत साजरा होणारा महाशिवरात्र उत्सव यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 20, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Mahashivratri-Festival

Photo Courtesy : Shashikant Belhekar


श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड घेरेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या तसेच, तळेगाव दाभाडे येथील कार्यकर्त्यांच्या वतीने परंपरागत साजरा होणारा महाशिवरात्र उत्सव यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ( Mahashivratri Festival At Lohgad Fort Maval Taluka )

लोहगडावरील महादेव मंदिरात जिल्हा परिषद सदस्या अलकाताई व गणेशभाऊ धानिवले यांचे वतीने अभिषेक करण्यात आला. लोहगड गावातून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी रांगोळ्या काढून महिलांच्या वतीने शिवप्रभूंच्या पालखीचे औक्षण करण्यात आले. सुंदर फुलांनी शिवस्मारक सजावट करण्यात आली होती. शिववंदनेने शिवस्मारकावर अभिवादन करण्यात आले. यावेळी असंख्य ग्रामस्थ व शिवभक्त उपस्थित होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शिवघोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमासाठी रायगड मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, प्रकाशराव मिठभाकरे,पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने सचिन भोरडे, नागेश मरगळे, गणपत ढाकोळ, रमेश बैकर, पोपट दिघे, शंकर चिव्हे, बाळू ढाकोळ, आदी ग्रामस्थांनी आभार मानले. शिवभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था उद्योजक चंद्रकांत भन्साळी यांच्या वतीने करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे नियोजन सचिन टेकवडे, विश्वास दौंडकर, संदीप गाडे, सागर कुंभार, अनिकेत अंबेकर, चेतन जोशी, घनश्याम लोणकर, शंकर मोरे, अजय मयेकर, अमोल गोरे, गणेश उंडे,सचिन निंबाळकर,बसप्पा भंडारी, संदीप भालेकर, निलेश अप्पा बोसले, तात्यासाहेब भराटे, अशोक भोसले, सचिन आमले, बजरंग पोटमारे, महेश मोरे, नितीन भुरंगे, सचिन शिंदे आदी कार्यकर्त्यांनी केले होते.

हेही वाचा – शिवजयंतीनिमित्त गरजूंना अन्नधान्य कीटचे वाटप; अनिकेत घुलेंच्या संकल्पनेतून शिळींब गावातील मंडळाचा स्तुत्य उपक्रम

लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड घेरेवाडी ग्रामस्थ व भारतीय पुरातत्व विभाग यांच्या संघटित प्रयत्नातून शनिवारी दिमाखात पुन्हा कात टाकून उभा राहिलेला लोहगड आपणास पहायला मिळतो. मुख्य द्वाराला बसविलेला भक्कम सागवानी दरवाजा हा महाराष्ट्रातील पहिला किल्ला म्हणून हा मान लोहगडाला जातो. पुढे मंचाच्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आले आणि शिवकालीन प्रथेनुसार गडाचे दरवाजे दररोज संध्याकाळी बंद झाल्यामुळे गडावरील अनुचित प्रकारांना आळा बसला. मंच आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. लोहगडाच्या पायथ्याला भव्य शिवस्मारक उभे राहिले. मंचाच्या पाठपुराव्यामुळे लोहगडाचे तटबंदी, बुरुज, पायऱ्या, दिशादर्शक फलक इत्यादी दुर्गसंवर्धनाची कामे भारतीय पुरातत्व विभागामार्फत पूर्ण करण्यात आली.

लोहगडावरील शिवमंदिराचा जीर्णोद्धार ज्या मंचाच्या पुढाकाराने झाला, त्यांनाच या ठिकाणी महाशिवरात्र साजरी करण्याला अडकाठी करण्याचा प्रयत्न भारतीय पुरातत्व विभागामार्फत करण्यात आला. आज आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी होत असताना महाराष्ट्रात मात्र लोहगडावर शिवप्रभूंच्या पालखी मिरवणुकीला बंदी घालण्यात येते हे खूप निंदनीय आहे आणि याचा निषेध समस्त शिवभक्तांच्या वतीने संस्थापक सचिन टेकवडे यांनी व्यक्त केला. तसेच, याची दखल महाराष्ट्र शासनाने ताबडतोब घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अधिक वाचा – 

– राजा शिवछत्रपती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दिनेश ढोरे; पाहा समितीची संपूर्ण कार्यकारिणी 
– पवना शिक्षण संकुलात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न, पारंपारिक वेषातील बालगोपाळांनी वेधले सर्वांचेच लक्ष


Previous Post

मोठी बातमी! नीलम गोऱ्हेंवर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेचा हात हरपला

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणाऱ्या 2 महिलांविरोधात गुन्हा दाखल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Prostitute-Business

सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणाऱ्या 2 महिलांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Massive fire breaks out at scrap warehouse along old Pune-Mumbai highway in Kamshet Maval

कामशेत येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग ; लाखोंचा माल भस्मसात

April 7, 2026
Tragic incident An 80-year-old man died after falling into a well in Takve Budruk Maval

दुर्देवी घटना ! टाकवे बुद्रुक येथे विहिरीत पडून ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

April 7, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी राज्यातील १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत

April 7, 2026
Two new metro projects should be approved in Maval taluka Bala Bhegde demands from CM Devendra Fadanvis

मावळ तालुक्यात दोन नवीन मेट्रो प्रकल्पांना मंजूरी द्यावी ; बाळा भेगडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 7, 2026
Big relief for Talegaon Dabhade People on water issue Inauguration of water purification center at Yashwant nagar

तळेगावकरांना पाणीप्रश्नावर मोठा दिलासा ; यशवंतनगर येथील ३ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण

April 6, 2026
Lonavala Smart City development plan Focus on AI based CCTV road beautification traffic management

लोणावळा शहराचा ‘स्मार्ट सिटी’ धर्तीवर विकास आराखड्यास गती ; ‘एआय’ आधारित CCTV, रस्ते सुशोभीकरण व ट्रॅफिक व्यवस्थापनावर भर

April 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.