वडगाव मावळ (दि. 18 एप्रिल) : मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी मंगेश हुलावळे आणि शरद कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. 18) खरेदी विक्री संघाचे सभापती शिवाजी असवले आणि उपसभापती अमोल भोईरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तज्ञ संचालक निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी महायुती नेत्यांच्या सूचनेनुसार हुलावळे आणि कुटे यांची नियुक्ती करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी संघाचे संचालक किरण हुलावळे, बाजीराव वाजे, एकनाथ येवले, माणिक गाडे, रुपेश घोजगे, गणेश विनोदे, प्रमोद दळवी, रमेश भूरुक, शहाजी कडू, ज्ञानेश्र्वर निंबळे, विष्णू घरदाळे, शरद नखाते, मधुकर जगताप, आशा खांडभोर, मनीषा आंबेकर, सुनीता केदारी, सचिव किरण लोहर उपस्थित होते. ( Mangesh Hulawle and Sharad Kute Appointed as Expert Director of Maval Taluka Kharedi Vikri Sangh )
दरम्यान महिन्याभरापूर्वी झालेली खरेदी विक्री संघाची निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवण्यात आली होती. त्या निवडणुकीच्या वेळी महायुती नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केलेल्या अनेक कार्यकर्त्यांना तज्ञ संचालक पदी संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी झालेल्या विशेष सभेत मंगेश हुलावळे आणि शरद कुटे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच येत्या पाच वर्षांच्या कार्यकाळात विविध कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– वन्यजीवांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार! जंगलातील पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, मावळमध्ये वनविभागाचा स्तुत्य उपक्रम
– मावळ लोकसभा निवडणूक : नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे 27 व्यक्तींनी नेले उमेदवारी अर्ज
– चिंचवड आणि पनवेलची जनता ठरवणार ‘मावळ’चा नवा खासदार; दोन्ही मतदारसंघात तब्बल 11 लाख 61 हजार मतदार, वाचा अधिक