व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘आता सरकारला वेळ द्यायचा नाही’ म्हणत मनोज जरांगेंनी सांगितला ‘चलो मुंबई’चा प्लॅन, मावळात ‘इथे’ होणार मुक्काम । Maratha Reservation

मराठा आरक्षण मागणीसाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा मार्ग जाहीर केला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 15, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Manoj-Jarange-Patil

Photo Courtesy : Team Dainik Maval


मराठा आरक्षण मागणीसाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा मार्ग जाहीर केला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहेत. परंतू, त्यासाठी ते 20 जानेवारी रोजी त्यांचे गाव अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करणार आहे. त्यांच्या पायी प्रवासात अंतरवली ते मुंबई दरम्यान मुक्काम कुठे कुठे असणार आहे, याबाबत स्वतः जरांगेंनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अंतरवाली येथून केव्हा निघणार, कुठे मुक्काम असणार, मुंबईत किती लोक येणार? हेही मनोज जरांगेंनी सांगितले. मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी मुंबईसाठी सकाळी 9 वाजता निघतील. त्यानंतर सर्व मराठा बांधव शंभर टक्के मुंबई जाणार आहे. त्यांनी आपल्या खाण्या पिण्याच्या वस्तू सोबत घ्यायच्या आहेत. शिवाजी पार्क आणि आझाद मैदान आम्हाला दोन्ही मैदान लागणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. ( Maratha Reservation Manoj Jarange Patil To Begin Indefinite Hunger Strike In Mumbai From January 26 Read Plan )

असा असणार पायी मार्ग :

  • 20 जानेवारी पहिला मुक्काम – बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात (बीड)
  • 21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (अहमदनगर)
  • 22 जानेवारी तिसरा मुक्काम – रांजणगाव (पुणे जिल्हा)
  • 23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास (पुणे)
  • 24 जानेवारी पाचवा मुक्काम – लोणावळा (पुणे)
  • 25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी (नवी मुंबई)
  • 26 जानेवारी 7 वा मुक्काम – आझाद मैदान (आंदोलन स्थळी)

पुण्यात दोन दिवस थांबणार, पुणे पाहणार –
‘पुण्यामध्ये मराठा समाज बांधवाचा आकडा एक करोडो होणार आहे. आम्ही पुण्यात दोन दिवस थांबणार आहे. आम्हाला पुणे बघायचे आहे. पुण्यावरुन सर्व प्रकारची वाहने मुंबईकडे जाणार आहे. मुंबई जाणारे प्रत्येकजण आपल्या वस्तू सोबत घेणार आहेत. त्यांनी झोपताना आपल्या वाहनाजवळ झोपायचे आहे. मुंबई जाताना कुणीही व्यसन करायचे नाही. तसेच प्रत्येक जणांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे. ज्यांच्याकडे पाण्याचे टँकर असेल, जनरेटर असेल त्यांनी ते घेऊन यावे,’ असे आवाहन जरांगे यांनी.

आता सरकारला वेळ द्यायचा नाही –
‘प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी त्यांच्या गावाच्या हद्दीपर्यंत मराठा कार्यकर्त्यांसोबत चालायचे आहे. अंतरवलीमधून मी एकटा निघणार आहे. मग सोबत एक लाख असो की एक कोटी असो, ते पाहिले जाईल. रोज पायी बारावाजेपर्यंत चालायचे आहे. त्यानंतर मुक्कामी करायचा आहे. 90 ते 100 किलोमीटरवरच्या आत मुक्काम असणार आहे. आता सरकारला आता वेळ द्यायचा नाही,’ असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– ग्रामीण भागातील ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील गरजू लाभार्थ्यांना घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया । Pradhan Mantri Awas Yojana
– मकर संक्रांतीनिमित्त एकापेक्षा एक खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, तुमच्या प्रिय व्यक्तींना पाठवा तिळगुळासारखे गोड मेसेज। Makar Sankranti Marathi Wishes
– ‘द कॉर्बेट फाऊंडेशन’ आणि ‘एचडीएफसी बँक – परिवर्तन’ मार्फत वनविभागाला 140 फॉरेस्ट कीटचे वाटप


Previous Post

मावळमधील 91 गावात राबवली जाणार प्रधानमंत्री जनमन योजना; कातकरी समाजातील नागरिकांना मिळणार विविध शासकीय योजनांचे लाभ

Next Post

श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त 22 जानेवारीला मावळ तालुक्यात मांस आणि मद्य विक्रीला बंदी? भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ban-on-Liquor-Meat

श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त 22 जानेवारीला मावळ तालुक्यात मांस आणि मद्य विक्रीला बंदी? भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Renovation of classrooms at New English School in Vadgaon with Rs 31 lakh CSR fund from Astemo Fi Company

ॲस्टेमो फाय कंपनीच्या ३१ लाख सीएसआर निधीतून वडगावमधील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या वर्गखोल्यांचे नूतनीकरण

March 11, 2026
Hope for the Children Foundation honors accomplished women in social and administrative fields in Maval

‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मावळातील सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

March 11, 2026
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

पुणे, नागपूर सहीत ‘या’ ११ जिल्ह्यात नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

March 11, 2026
More than 180 women participated in a one-day health camp organized by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय आरोग्य शिबिरात १८० हून अधिक महिलांचा सहभाग

March 11, 2026
Maval taluka gets seven awards under Maha Awas Abhiyan

महाआवास अभियानअंतर्गत मावळ तालुक्याला सात पुरस्कार ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीडीओ कुलदीप प्रधान यांनी स्वीकारले पुरस्कार

March 11, 2026
Now you wont have to wait six months for land survey land survey cases will be settled within 30 days

मोजणी प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी राज्यात खासगी परवानाधारक भूमापकांची नियुक्ती

March 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.