मकरसंक्रांत म्हणजे नव्या वर्षाचा पहिला सण. पण हा सण साजरा करताना जुणेच मेसेज फॉरवर्ड करण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये, यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही खास मराठमोळे मेसेज.( happy makar sankranti wishes in marathi ) तुम्ही हे मेसेज पाठवून तुमच्या प्रियजनांची मकर संक्रांत तिळगुळाप्रमाणे आणखीन गोड करू शकता. असे म्हणतात की गोडव्याची चव थोड्याशा कडुपणाने वाढते, त्यामुळे काही मजेशीर शुभेच्छा सुद्धा आम्ही देत आहोत. चला तर मग पाहूया गोड गोड मकर संक्रांतीच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा…
मराठी अस्मिता मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज मकर संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
म…….. मराठमोळा सण,
क……. कणखर बाणा,
र……… रंगेबिरंगी तिळगुळ,
सं…….. संगीतमय वातावरण,
क्रां……. क्रांतीची मशाल,
त……… तळपणारे तेज,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
शब्द रुपी तिळगूळ घ्या,
गोड बोलतच आहात तसेच बोलत रहा”
मकर संक्रांत हा एक गोड सण आहे.
तुम्हाला शुभेच्छा देण्याचे एक निमित्त आहे.
ही मकर संक्रांत तुम्हाला व कुटुंबातील
सर्व सदस्यांना येत्या वर्षात खूप भरभराट,
सुखसम्रुध्दी व उत्तम आयुआरोग्य घेऊन येवो
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
मकर संक्रांतीच्या या शुभ दिवशी,
सुख, समृद्धी आणि समाधानाने तुमचे आयुष्य उजळून निघो हीच इच्छा!
येणारी मकर संक्रांत ही तुम्हाला तुमच्या
आयुष्यात कोणतेही संकट न येता भरभरून
यश घेऊ येवो ही सदिच्छा.
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
तुमचे आयुष्य यावेळी सूर्याच्या किरणांप्रमाणेच,
सुखाने आणि भरभराटीने भरून जावो,
मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो,
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
“तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु,
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोडवा येवो जीवनाला,
यशाची पतंग उडो गगना वरती,
तुम्हाला अणि तुमच्या कुटुंबाला,
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
काळ्या साडीवर हलव्याचे दागिने खास,
नाती आपली जपू हाच ठेवा ध्यास,
पूजा करूया नी रचूया सुगडाची रास,
एकमेकांवर ठेऊनी विश्वास!
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
नवीन वर्षाचा पहिला सण,
“मकर संक्रातीच्या” सर्वांना गोड गोड शुभेच्छा!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!
दिवस-रात्र, वर्ष-महिने,
सुख-दु:ख सर्व काही बदलतील,
बदलत नाही ती फक्त
माणसा-माणसांतील अनमोल नाती
तीच जापुया…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
दिवस संक्रांतीचा
मधुर वाणीचा
रंग उडत्या पतंगाचा,
बंध दाटत्या नात्यांचा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभ्र गोड हलवा, त्याला रंग केशराचा,
स्पर्शातच फुलवी काटा, हात कौतुकाचा,
अर्पिला तुम्हाला हलवा, गोड करून घ्यावा,
गोड गोड शब्दासंगे स्नेहभाव द्यावा.
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
एक तिळ रुसला फुगला,
रडत रडत गुळाच्या पाकात पडला,
खुद्कन हसला, हातावर येताच बोलू लागला…
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
विसरुनी जा दुःख तुझे हे
मनालाही दे तू विसावा,
आयुष्याचा पतंग तुझा हा
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
थंडीच्या कडाक्यात उठून
मस्त आंघोळ करुया
मग गरमागरम गूळपोळी खाऊया
पतंगबाजीचा आनंद लुटूया
एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊया!
रंगीबेरंगी पतंगांसोबत मन झालं बाजिंद,
संक्रातीचा सण चला करूया आनंदाने साजिरं,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
मांजा, चक्री,
पातंगाची काटाकाटी,
हलवा, तीळगुळ, गुळपोळी
संक्रांतीची लज्जत न्यारी
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!
आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोडवा,
स्नेह वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!
जसे तीळ आणि गुळ तसेच
तू आणि मी येऊन एकत्र,
विसरु सारे बहाणे,
गाऊ मधुर जीवन गाणे…
संक्रांतीच्या शुभेच्छा !
“पतंगाच्या मांज्याला ढील देऊया,
आकाशात उंच उंच पतंग उडवूया,
तिळाचे लाडू नी तिळगुळ खाऊया,
एकमेकांशी गोड बोलून नाती जपूया,
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !”
नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग
आणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंग
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
झाले गेले विसरून जाऊ,
तिळगुळ खात गोड गोड बोलू ..!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
तिळगुळाचा गोडवा आकाशात पतंगांची भरारी
आपल्या आयुष्यात येवो मकर संक्रांतीच्या दिवशी अप्रतिम झळाळी
लहानांचे बोरन्हाण,
मोठ्यांची पतंगबाजी,
सुवासिनींचे हळदीकुंकू,
घेऊन आला सण मकरसंक्रांती!
मकरसंक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
“पतंगाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळत राहो
अर्थात यशाच्या शिखरावर जाताना तुम्ही पतंगाप्रमाणे उंच उंच जावो
हीच सदिच्छा…संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !”
ज्याची वाट पाहाता होतो असा मकरसंक्रांतीचा हा दिवस आला खास
हृदयामध्ये प्रेम आणि हास्याची रंगत घेऊन उधळूया स्वप्नांची आरास
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
“जसा सूर्य उत्तरेकडे प्रवास सुरू करतो,
तेव्हा आपण एकत्र येऊ आणि हा समृद्धीचा हंगाम
प्रेम, शांती आणि आनंदाने साजरा करू
मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा”
आकाशातील उत्तुंग पतंगाप्रमाणे तुझ्या आशा-आकांक्षानी घ्यावी उंच भरारी
उत्तरायणाच्या शुभेच्छा देत देवापाशी मागतो केवळ हीच प्रार्थना करारी.
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
संक्रांतीचा सुदिन मंगल आज आला,
मी हा स्वत:च तीळगुळ सुरेख केला,
या शुभ्रतेत भरला मधुन ची रंग,
घ्या चाखुनी, हृदयी प्रेम असो अभंग.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सूर्याने बदलली आज आपली राशी,
गंगा स्नान करून आले सर्व मनुष्यवासी,
पतंगांचा जल्लोष घेऊन आला आनंदाचा सण,
आपल्याला शुभेच्छा देताना प्रफुल्लित झाले माझे मन.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
आनंदाची आली भरती तू आयुष्यात येण्याने
पतंगासह घेऊ उंच भरारी तिळगुळासह गोडव्याने
संक्रांतीच्या प्रेमळ शुभेच्छा!
संक्रांतीची भेटकार्ड, हलव्याचे चार दाणे,
प्रेम व्यक्त करायची आजकालची साधने,
तुम्हा आम्हा सर्वांनी प्रेम ऐसे व्यक्त व्हावे,
प्रेमाच्या त्या बहराने जीवनात सुखी व्हावे.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
झाले गेले विसरून जाऊ,
तिळगुळ खात गोड गोड बोलु.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
गोड नाती गोड सण,
तुम्हाला मिळो खूप धन,
आनंद ऐश्वर्य सुख समृद्धी,
राहो तुमच्या अंगणी,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!