मावळ तालुक्यातील कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना कुणबी दाखले देण्यात यावे, तसेच ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याची यादी जाहीर करावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी तहसीलदारांकडे केली आहे. यासंदर्भात तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता लवकरात लवकर ही कार्यवाही करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काय आहे निवेदनात?
मागील काळामध्ये शासनाने दिलेल्या आदेशानुसार मावळ तालुक्यातील ज्या मराठा समाजातील बांधवांच्या कुणबी नोंदी सापडले आहेत, त्याची यादी जाहीर करावी. जवळपास 13000 नोंदी सापडल्या, तुम्ही जाहीर केल्या होत्या परंतु अद्यापही त्याची माहिती प्रमाणपत्र संबंधित मराठा बांधवांना मिळाले नाहीत. सध्या शालेय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळून सुद्धा खुल्या प्रवर्गामुळे यादीमध्ये नाव येत नाही. सदर विद्यार्थी कुणबी असल्याने ओबीसीमध्ये स्थान मिळत नाही, अशा अनेक अडचणी कुणबी नाव असून सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र न मिळाल्याने समाजाला मराठा सहन करावा लागत आहे. यावर विचार करून तात्काळ आठ दिवसाच्या आतमध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या नोंदी नुसार वाटप करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
यावेळी सकल मराठा समाजाचे दिनेश ठोंबरे, तुषार वहिले, संजय शिंदे, प्रदीप आंद्रे, सचिन कडू, अरविंद आवंडे, संदीप नवघणे, सुहास विनोदे, विजय शिंदे आदी शिवभक्त मराठा समन्वयक उपस्थित होते. ( Maratha with Kunbi records should be given certificates demand by sakal Maratha samaj maval )
अधिक वाचा –
– देवदर्शन यात्रा समितीच्या वतीने ‘श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच’चे वाटप
– शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
– सुजाता सौनिक बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव, जाणून घ्या त्यांच्याबद्दल । Sujata Saunik