मावळ तालुक्यातील हजारो शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिक ह्यांच्या संघर्षानंतर पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तत्कालीन प्रशासनाने आणि राज्य सरकारने स्थगित केला होता. परंतू, ह्याच पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती राज्य सरकारने तब्बल एक तपाच्या म्हणजेच 12 वर्षांच्या कालखंडानंतर उठवली. राज्य सरकारच्या ह्या निर्णयानंतर पुन्हा एकदा मावळ तालुक्यात तळागाळातील जनता आणि विविध राजकीय पक्ष, संघटना हे आक्रोश करत निर्णयाचा विरोध आणि सरकारचा निषेध व्यक्त करत आहेत. ( Maval All Party Action Committee march in case of lifting moratorium on Pavana Closed Water Channel Project )
अगदी दोन दिवसांत मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यात ही माहिती पोहोचल्यानंतर आता ह्या मुद्द्यावर स्थानिकांचा, शेतकऱ्यांचा असलेला विरोध लक्षात घेत तालुक्यातील विविध पक्ष यावर एकवटले आहेत. त्यानुसार पवना बंदिस्त जलवाहिनी बाबत अस्तित्वात असलेल्या सर्वपक्षीय कृती समितीने आज (बुधवार, दिनांक 13 सप्टेंबर) रोजी सोमाटणे इथे बैठक आणि पत्रकार परिषद घेतली. ह्या पत्रकार परिषदेत सर्वामुते घेतलेले काही निर्णयांची माहिती देण्यात आली. यातील सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे परवा अर्थात शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सर्वपक्षीय कृती समिती मावळ यांच्यावतीने पवना बंद जल वाहिनी स्थगिती उठवण्याचा निर्णयाविरोधात भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
“राज्य सरकारने मावळातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पवना बंद जलवाहिनेची स्थगिती उठवून तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. याविरोधात तालुक्यात प्रचंड चीड निर्माण झाली आहे, ही चीड व्यक्त करण्यासाठी व या स्थगिती उठविण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते व नागरिक यांचा एक भव्य मोर्चा शुक्रवार 15 सप्टेंबर रोजी तहसीलदार कचेरी, मावळवर काढण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रचंड संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे.” असे आवाहन सर्वपक्षीय कृती समिती मावळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पवना जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठवली! सरकारने हा निर्णय का घेतला? पत्रात नेमकं काय लिहिलंय? वाचा सविस्तर
– विरोध कालही..आजही आणि उद्याही! पवना बंदिस्त जलवाहिनीवरील स्थगिती उठवल्यानंतर रविंद्र भेगडेंनी स्पष्ट केली भुमिका
– मोठी बातमी! शिंदे सरकारने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठवली; मावळातील नेत्यांचे अपयशी प्रयत्न