राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा विचार आणि परवानगी न घेता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले, असे चित्र सध्या दिसतंय. त्यांच्या ह्या निर्णयाने सर्वात मोठा धक्का हा महाविकासआघाडी आणि उद्धव ठाकरे यांना बसला आहे. अशात मागील काही दिवसांपासून काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकीय संभ्रम वाढला आहे. अशात सावधानता बाळगत उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे मिशन 48 सुरु केले आहे. ( Maval Lok Sabha Constituency Shiv Sena Uddhav Thackeray Vs Ajit Pawar Sharad Pawar Nationalist Congress Party )
अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने देखील खबरदारीचा उपाय म्हणून लोकसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याची चाचपणी सुरू केल्याचे दिसत आहे. त्यानुसार आता पक्षाकडून वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार असून पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दिनांक 18 ऑगस्टला आढावा घेतला जाणार आहे.
मावळ मतदारसंघात तसे पाहता 2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीन वेळा शिवसेनेचाच खासदार आहे. परंतू आता सध्याचे तिसऱ्या वेळीचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत म्हणजेच ‘खऱ्या’ शिवसेनेसोबत आहे. परंतू शिवसेनेचाच पारंपारिक मतदारसंघ असलेल्या मावळसाठी महाविकासआघाडीतील ठाकरे गट अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील तितकाच आग्रही असणार असून त्यांच्याकडून तसे उमेदवारी चेहरे पुढे येत आहेत.
अशावेळी ठाकरे सलग तीन वेळचा मतदारसंघ ताब्यात ठेऊन पवारांना आपली पॉवर दाखवणार का? याची चर्चा रंगली आहे. शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या लोकसभानिहाय मतदार संघाच्या बैठकीला संबंधित ग्रामीण मतदारसंघातील संपर्क नेते, स्थानिक उपनेते, जिल्हासंपर्कप्रमुख, स्थानिक विभागीय महिला संघटीका, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख तसेच शहरातील विधानसभाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख या बैठकांना हजेरी लावतील. ( Maval Lok Sabha Constituency Shiv Sena Uddhav Thackeray Vs Ajit Pawar Sharad Pawar Nationalist Congress Party )
16 ऑगस्ट – नंदुरबार, धुळे, जळगाव आणि रावेर
17 ऑगस्ट – अहमदनगर, नाशिक, दिंडोरी आदी मतदासंघ
18 ऑगस्ट – मावळ, शिरूर, बारामती, पुणे
19 ऑगस्ट – सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले आदी
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– हर घर तिरंगा – मेरी माटी मेरा देश – पंचप्रण शपथ । पवनानगरमधील पवना शिक्षण संकुलात देशाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
– अडीच हजार महिला भगिनींच्या उपस्थितीत वडगावमध्ये श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण; हळदी-कुंकू समारंभाने कार्यक्रमाची सांगता
– मावळ तालुक्यातील इंदोरी आणि सुदुंबरे येथील 284 आदिवासी ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप