‘लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता मिळालेल्या मतदानाचा सकारात्मक विचार करून आपण विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागूया. पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणमधून आमदार महेश बालदी निश्चित विजयी होतील,’ असा दावा मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. पनवेल येथे रविवारी (दि. 16 जून) रोजी झालेल्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोकसभा निवडणुक 2024 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या वतीने पनवेल येथील क्रांतिवीर वासुदेव फडके सभागृह येथे खासदार श्रीरंग बारणे यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधत असताना भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल बारणे यांनी मतदारांचे आभार मानले. ( Maval Lok Sabha MP Shrirang Barane grand felicitation at Panvel )
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतशेठ ठाकूर, आमदार महेशशेठ बालदी, आमदार निरंजन डावखरे, मावळ लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, भाजपा जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, महानगर पालिका सभागृह नेते परेशशेठ ठाकूर, शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख परेशभाई पाटील,शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण,भाजपा तालुका अध्यक्ष अरुणजी भगत, मा महापौर कविताताई चौतमल, शिवसेना तालुका प्रमुख रूपेश ठोंबरे,भाजपा पनवेल शहर अध्यक्ष अनिल शेठ भगत, तुकाराम सरख, प्रसाद परभ, रमेशजी गुडेकर तसेच महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडेमधील हॉटेल थंडा मामला येथे चोरी । Talegaon Crime
– मोबाईल नंबर दिला नाही म्हणून महिलेवर चाकूने हल्ला ! मावळमधील धक्कादायक प्रकार, वडगाव पोलिसांकडून आरोपीला अटक
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई ! अमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक, साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त । Lonavala Crime