Dainik Maval News : संविधानाने आपल्याला पद दिले तर त्या प्रत्येक पदाला कसा न्याय देता येईल, हे आपण पाहिले पाहिजे. आपण जबाबदारी घेऊनच काम करावे लागते. मी तुम्हाला सांगतो उद्याच्या काळात मला आदिवासी विभाग जर दिला, तरी मी खूप जोमाने काम करीन. शेवटी तळागाळातल्या माणसांना देखील शासनाच्या योजनांच्या माध्यमातून कसा न्याय देता येईल, हे आपण पाहिले पाहिजे. प्रत्येक खात्याला, प्रत्येक विभागाला एक चांगल्या पद्धतीचे महत्त्व आहे, असे आमदार सुनिल शेळके म्हणाले.
माध्यम प्रतिनिधींनी मंत्रिपदाबाबत विचारले असता शेळके बोलत होते. कोणतेही पद मिळाले तरी त्याचा उपयोग आपण लोकांसाठी करू. अगदी आदिवासी विभाग जरी मिळाला तरी मी खूप जोमाने काम करून तळागाळातल्या माणसांना देखील शासकीय योजनांचा लाभ मिळवून देईन. प्रत्येक विभागाला एक चांगल्या पद्धतीचे महत्त्व असते, असे म्हणत मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळेल असा आशावाद व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे, हे आम्हाला सर्वांनाच मान्य करावे लागणार आहे. त्यांचे संख्याबळ जवळपास १३२ ते १३७ पर्यंत पोहोचले आहे. त्या खालोखाल शिवसेनेचे संख्याबळ व त्यानंतर राष्ट्रवादीचे संख्याबळ आहे. आता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळात किती स्थान मिळणार आहे, किती जागा मिळणार आहेत, ते अद्याप निश्चित नाही. त्यामध्ये पक्षातील ज्येष्ठ मंडळी आहेत. पक्षामध्ये काम करणारे काहीजण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत आणि प्रत्येक समाजाला, प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाण्याचे काम दादा सातत्याने करत आलेले आहेत.
त्यामुळे उद्याच्या काळामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये किती मंत्री पदे मिळतात आणि आम्हाला राष्ट्रवादीत कोणती खाती मिळतात ते देखील अजून ठरायचे आहे. वरिष्ठ नेत्यांनी, अजितदादांनी उद्याच्या काळात जबाबदारी दिली तर नक्कीच तालुक्यासोबत पक्ष संघटनेसाठी देखील मी अधिकच वेळ देईन, असे शेळके म्हणाले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांना भेटण्यासाठी मावळच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांची गर्दी, महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती
– नवनिर्वाचित आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी घेतली आमदार सुनिल शेळके यांची भेट । Talegaon Dabhade
– स्तुत्य उपक्रम ! वडगाव मावळ शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रातील ४५५ विद्यार्थ्यांना उबदार स्वेटर भेट । Vadgaon Maval