व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देशातल्या ‘टॉप-टेन’ खासदारांमध्ये मावळचे खासदार श्रीरंग बारणेंचा समावेश, पहिल्या स्थानी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे

खासदार श्रीरंग बारणे यांनी आत्तापर्यंत सतराव्या लोकसभेत 508 प्रश्न विचारले आहेत. 148 वेळा चर्चेत सहभाग घेतला. सभागृहातील उपस्थितीती 94 टक्के असून दहा टक्के खासगी विधेयके मांडली आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 23, 2023
in देश-विदेश, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Shrirang-Barne-And-Supriya-Sule

Photo - Dainik Maval Graphics Team


‘गेट वे पॉलिटिकल स्टॅटेजिक’ संस्थेमार्फत सतराव्या लोकसभेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या सत्रापर्यंतच्या देशातील खासदारांच्या कामगिरीचे विश्‍लेषण करण्यात आले आहे. त्यानुसार संसदेतील कामकाजात सक्रिय सहभागी होणा-या ‘टॉप-टेन’मध्ये मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. 148 वेळा चर्चेत सहभाग आणि 508 प्रश्न विचारत खासदार बारणे यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तसेच पहिल्या स्थानी या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या आहे. एकूण महाराष्ट्रातील चार खासदार टॉप टेन मध्ये आहे, ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. ( Maval Shiv Sena MP Shrirang Barne Included In Top 10 MP Of The Country NCP Supriya Sule At First Place )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

देशाच्या लोकसभेतील खासदारांच्या कामाचे मुल्यांकन केले जाते. त्यानुसार सतराव्या लोकसभेतील खासदारांच्या कामगिरीचे मुल्यांकन केले आहे. त्यातील पहिल्या दहा खासदारांची यादी लोकसभेच्या संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये मावळचे खासदार श्रीरंग बारणे दुस-या स्थानावर आहेत. महाराष्ट्रातील अन्य तीन खासदार पहिल्या दहामध्ये आहेत. भाजपचे तीन, शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा एक आणि डीएमकेचे दोन असे खासदार पहिल्या दहाच्या यादी आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी आत्तापर्यंत सतराव्या लोकसभेत 508 प्रश्न विचारले आहेत. 148 वेळा चर्चेत सहभाग घेतला. सभागृहातील उपस्थितीती 94 टक्के असून दहा टक्के खासगी विधेयके मांडली आहेत. सोळाव्या लोकसभेत देखील कामकाजात खासदार बारणे अग्रभागी होते. सतराव्या लोकसभेतही खासदार बारणे यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. खासदार श्रीरंग बारणे हे सातत्याने मावळातील प्रश्न लोकसभेत मांडतात. त्याबाबत आवाज उठवितात. या कामगिरीमुळे खासदार श्रीरंग बारणे यांना सलग सातवेळा संसदरत्न, महासंसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

हेही वाचा – नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमाबाईने घेतली पंतप्रधानांची भेट, मोदींनी दिले ‘हे’ आश्वासन

लोकांमध्ये राहणारा, लोकांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा, जमिनीवर राहून काम करणारा खासदार अशी श्रीरंग बारणे यांची ओळख आहे. मागील नऊ वर्षांपासून मतदारसंघात विविध विकास कामे केली आहेत. अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली आहेत. खासदार बारणे पहिल्या दहामध्ये आल्याने मतदारसंघातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या यादीत अग्रभागी आहेत. तर, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आठव्या आणि राहुल शेवाळे नवव्या स्थानी आहेत.

“मावळच्या जनतेने माझ्यावर सलग दोन वेळा विश्वास टाकला. देशाच्या संसदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरेल असे कामकाज करत आहे. संसदेतील कामकाजात सक्रियपणे सहभाग घेवून मतदारसंघातील प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवितो. प्रश्न मार्गी लावून घेतो. सतराव्या लोकसभेत आत्तापर्यंत 508 प्रश्न विचारले आहेत. 148 वेळा चर्चेत सहभाग घेतला. सभागृहातील उपस्थितीती 94 टक्के असून दहा टक्के खासगी विधेयके मांडली आहेत. संसदेतील या कामगिरीमुळे देशातील पहिल्या दहा खासदारांमध्ये माझा समावेश आहे. यामुळे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली. यापुढेही मावळच्या जनतेची अशीच सेवा करत राहील.” अशी प्रतिक्रिया खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी दिली.

अधिक वाचा –

– ‘एक इशारा अन् साफ झाला माहीमचा किनारा’, राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर शिंदे सरकारची तत्काळ कारवाई, ‘ती’ मजार हटवली
– शिरगाव पोलिसांची मोठी कारवाई, बेकायदा मांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला, टेम्पोत तब्बल 5 टन मांस


dainik maval jahirat

Previous Post

शिरगाव पोलिसांची मोठी कारवाई, बेकायदा मांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला, टेम्पोत तब्बल 5 टन मांस

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज की…जय!! मावळमधील साते गावात छत्रपती शिवरायांच्या भव्यदिव्य शिवस्मारकाचे लोकार्पण

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sat-village-Maval-Taluka

छत्रपती शिवाजी महाराज की...जय!! मावळमधील साते गावात छत्रपती शिवरायांच्या भव्यदिव्य शिवस्मारकाचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

important meeting to expedite pending issues development works related to Water Resources Department in Maval Taluka

मावळ तालुक्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न व विकासकामांना गती देणारी महत्वपूर्ण बैठक

August 26, 2026
DCM Eknath Shinde visits Talegaon Dabhade Chakan industrial areas inspects road repairs

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्राला भेट; रस्ते दुरुस्तीची केली पाहणी

August 25, 2026
Conduct an immediate audit of government health system in Maval Taluka BJP aggressive stance on health issues

मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

August 25, 2026
MLA Sunil Shelke holds crucial meeting with administration to accelerate development works in Maval Taluka

मावळच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत आमदार सुनील शेळके यांची महत्त्वपूर्ण बैठक

August 25, 2026
Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.