Dainik Maval News : मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. संघाच्या संचालक पदाच्या अकरा जागांवर अकरा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. ए. कुलकर्णी यांनी जाहीर केले आहे.
मावळ तालुका कार्यकारी सहकारी ग्रामोदयोग संघ मर्या., वडगाव (ता. मावळ) ची सर्वसाधारण मतदार, महिला राखीव, अनुसूचित जाती/जमाती राखीव, इतर मागासवर्गीय राखीव, भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातील सन 2024-25 ते 2029-30 या कालावधीसाठीची निवडणूक जाहीर करण्यात आली होती.
- निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेनंतर ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे जवळपास स्पष्ट झाले होते. यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम 20213 च्या नियम 32 ला अनुसरुन निवडणूक निर्णय अधिकारी एम. ए. कुलकर्णी यांनी संघाच्या प्रत्येक मतदार संघात एका जागेवर एकच उमेदवार असल्याने ते बिनविरोध निवडणूक आल्याचे जाहीर केले आहे.
बिनविरोध निवडणूक आलेले संचालक व मतदारसंघ
1. साहेबराव तुळशीदास मोहिते ( खनिज आधारित उद्योग)
2. सुरेश धोंडीबा जाधव (वनावर आधारित उद्योग)
3. भरत गणपत गरूड (कृषी आधारित व खाद्य उद्योग)
4. अंकुश रामचंद्र आंबेकर (पॉलीमर व रसायन आधारित उद्योग)
5. छबुराव चिंधू गायकवाड (अभियांत्रिकी व अपारंपारिक उर्जा)
6. चंद्रकांत निवृत्ती दाभाडे (वस्त्रोद्योग व सेवा उद्योग)
7. भावना सुभाष ओव्हाळ (महिला प्रतिनिधी)
8. कल्पना अनिल भोर (महिला प्रतिनिधी)
9. अमित पांडुरंग ओव्हाळ (अनुसुचित जाती/जमाती)
10. संतोष दगडू कुंभार (इतर मागास वर्ग)
11. अन्वर इब्राहिम सिलीकर (भ.ज/विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्ग)
मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघ
सन 1972 मध्ये मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची स्थापना झाली असून, वडगाव मावळ येथे मावळ पंचायत समितीच्या आवारात मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे कार्यालय आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर प्रथमच संपूर्ण तालुक्यासाठी असलेल्या या संघाच्या निवडणूकीकडे सर्वंचे लक्ष लागले होते. परंतु नुकत्याच झालेल्या श्री संत तुकाराम साखर कारखान्याच्या बिनविरोध निवडणूकीनंतर मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाची निवडणूक देखील बिनविरोध झाल्याने तालुक्यात नव्या राजकीय बदलाची नांदी दिसून येत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी निवडणूक । Sant Tukaram Sugar Factory Election
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा हद्दीत विचित्र अपघात, महिलेचा मृत्यू । Accident On Mumbai Pune Expressway
– वीटभट्टीवरील मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप ; सह्याद्री विद्यार्थी अकादमीकडून महामानवाला अभिवादन । Maval News
