मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘कार्यकर्ता मेळावा’ आणि ‘नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व सदस्य यांचा सत्कार समारंभ’ आज (शनिवार, 24 डिसेंबर) रोजी वडगाव मावळ येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला मावळचे विद्यमान आमदार सुनिल शेळके आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ( Maval taluka NCP felicitates newly elected Gram Panchayat Sarpanch and members at Vadgaon )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘मावळ तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्य यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करतो. गावाच्या सर्वसमावेशक विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील रहाल, ही आशा बाळगून पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो’, असे आमदार सुनिल शेळके यांनी म्हटले.
सदर कार्यक्रमाला मावळ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, मा अध्यक्ष बबनराव भेगडे, मा सभापती जिल्हा परिषद बाबुराव वायकर, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, दिपक हुलावळे,अध्यक्ष संदीप आंद्रे, अध्यक्ष किशोर सातकर, महिला अध्यक्ष दिपाली गराडे आणि इतर मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा –
– रेल्वे मार्गाच्या कामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत माय-लेकाचा मृत्यू, खासदार श्रीरंग बारणेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
– नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या पवना विद्या संकुलातील शाळांचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न