मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलची ( NCP OBC Cell ) आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. पक्षाच्या ओबीसी सेलमध्ये काम करत असलेल्या पदाधिकाऱ्यांपुढे असलेल्या विविध समस्या आणि त्यावर उपाययोजना यावर चर्चा करण्यासाठी वडगाव मावळ ( Vadgaon Maval ) येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मावळ तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे ( Ganesh Khandge ) यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न झाली. ( Maval Taluka NCP OBC Cell Worker Review Meeting )
या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान नगरसेवक चंद्रजित वाघमारे, मावळ तालुका सरचिटणीस रामदास वाडेकर, देहू शहराध्यक्ष विकास कंद आदी उपस्थित होते. सदर आढावा बैठकीत राष्ट्रवादीच्या ओबीसी सेल संघटनेत चालू असलेले काम तसेच पदाधिकारी यांच्या विविध समस्या आमदार महोदय आणि वरिष्ठांनी जाणून घेतल्या. तसेच त्यावर उपाययोजना आणि मार्गदर्शन केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 27 टक्के आरक्षण आहे. छगन भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यामुळे पहिल्यांदा मंडल आयोग महाराष्ट्रात 24 एप्रिल 1994 रोजी लागू झाला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामधे ओबीसींना 27 टक्के आरक्षण लागु झाले. याचा फायदा होऊन महाराष्ट्रात ओबीसी समाजातली सुमारे 68 हजार पदे आरक्षित झाली. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27 टक्के आरक्षण वैध ठरवले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
हेही वाचा – Video : शेतकऱ्याचा नादखुळा; फायबरच्या का असेना पण बैलांची जंगी मिरवणूक काढलीच! लेझीम, हलगी सर्वकाही
ओबीसी समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना अनेक महत्वाच्या पदावर पक्षात काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली. राष्ट्रवादी व ओबीसी पदाधिकारी यांचे नाते कशा पद्धतीने अजून घट्ट होईल, ओबीसी समाजातील दाखले, शैक्षणिक फी सवलती, रोजगार निर्मिती, महिला बचत गट, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी ना संधी अशा अनेक विषयावर सदर बैठकीत चर्चा करण्यात आली.
हेही वाचा – मावळमध्ये साधेपणाने मात्र उत्साहात बैलपोळा साजरा; शिळींब गावातील बैलांची सजावट ठरली आकर्षणाचा केंद्र
यावेळी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल राऊत, मावळ ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मंगेश खैरे, मावळ ओबीसी सेल महिला तालुकाध्यक्ष संध्या थोरात, मावळ वरिष्ठ उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, कार्याध्यक्ष तुकाराम ठोसर, कार्याध्यक्ष सचिन साळुंखे (कुंभार), प्रमोद शिंदे, बाळासाहेब ठिकडे, राजू दळवी, प्रशांत सुतार, गणेश सुतार, महेश गाडे, प्रमोद कदम, मयुर गुरव, स्वप्नील मावळकर, विकास चौधरी, उमेश तंबोरे, विनय लवांगरे, अक्षय बेल्हेकर, गणेश झरेकर, जयश्री पवार, प्रगती पाटील, वनमाला दळवी, रेखा बरिदे, मनीषा जाडकर, वैशाली लगाडे, अर्चना भोकरे, गंगा तळेकर, नीलिमा शिंदे, लीना दिघे, प्रणिता पिंपरीकर, लक्ष्मी गजाकोश, प्रीती नारायण, नंदा ठाकूर, सुधा भालेकर, नलिनी गायकवाड, अनिता देशमुख, शिल्पा चौधरी, संगीता भोरपकर, अनिता शिंदे, संगीता पटेकर, अनिशा बनसोडे, मीना शिंदे, अभिजित सुतार, राहील तांबोळी, स्वप्निल पावसकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ( Maval Taluka NCP OBC Cell Worker Review Meeting at Vadgaon )
अधिक वाचा –
लम्फीचा प्रादुर्भाव; आमदार सुनिल शेळकेंचे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन
मावळमध्ये शेतकऱ्याचा कौतुकास्पद उपक्रम! बैल पोळ्याच्या मिरवणूकीचा खर्च टाळून केली मोठी मदत