व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महायुतीचा बेसिक फॉर्म्युला सांगत आमदार सुनिल शेळकेंकडून भाजपाची कोंडी ; मावळ विधानसभा ठरणार कळीचा मुद्दा ?

मावळ तालुक्यातील सध्याचे राजकीय वातावरण पाहिल्यावर कुणालाही विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याचे समजून जाईल...

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 31, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
sunil-shelke-bala-bhegade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील सध्याचे राजकीय वातावरण पाहिल्यावर कुणालाही विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याचे समजून जाईल. तसे पाहता विधानसभा निवडणूकांसाठी अद्याप अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. मात्र मावळ तालुक्यात विधानसभा निवडणूकीची तयारी जोरात सुरू असल्याचे दिसत असून तालुक्यातील राजकीय तापमान देखील वाढू लागले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

Novel NIBR Ads

थोडं इतिहासात डोकावू –
मावळ विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सलग 25 वर्षे मावळात भाजपाचा आमदार होता. 1996 ते 2019 अशी सलग 25 वर्षे मावळात एकहाती भाजपाची सत्ता होती. परंतु, 2019 साली भाजपातच बंडखोरी होऊन सुनिल शेळकेंनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली. भाजपाने तिसऱ्यांना बाळा भेगडेंना उमेदवारी दिल्याने नाराज सुनिल शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, निवडणूक लढवली आणि राज्यमंत्री असलेल्या बाळा भेगडेंचा 90 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. तेव्हापासून मावळात राष्ट्रवादीचे प्रस्थ वाढू लागले. सद्यस्थिती मावळात भाजपापेक्षा राष्ट्रवादी वरचड असल्याचे दिसत आहे.

भाजपाची पत्रकार परिषद आणि राजकीय घडामोडींना वेग –
लोकसभा निवडणूकीत तिकीटासाठी डावलल्यानंतर मावळ तालुक्यात भाजपाने विधानसभेसाठी जोरदार कंबर कसली आहे. भाजपातून विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या देखील अधिक असून अनेक मातब्बर उमेदवार आहेत. अशात 2019 चा पराभव पुसून काढणे आणि 2024 च्या लोकसभेची कसर भरून काढण्यासाठी मावळ भाजपाचे कार्यकर्ते तयारीत असून याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी मावळ भाजपाने एक पत्रकार परिषद घेऊन आपले लक्ष्य जाहीर केले.

या पत्रकार परिषदेत मावळ विधानसभा मतदारसंघावर दावा करताना बाळा भेगडे यांनी, 1957 ते 2024 या काळात मावळ तालुक्यात जनसंघ, जनता पार्टी आणि भाजपा यांचा वरचष्मा असल्याचे सांगत संघटनेच्या बळावर लोकप्रतिनिधी निवडणूक देण्याची मावळ तालुक्याची एक आगळी-वेगळी ओळख असल्याचे सांगितले. त्यामुळे आमागी विधानसभा निवडणुकीतही परंपरागत आपला असणारा मतदारसंघ आपल्याला मिळावा, यासाठी आम्ही भाजप नेतृत्वाकडे आग्रहाची मागणी करणार आहोत, अशा शब्दांत भेगडे यांनी आगामी विधानसभा निवडणूकीत मावळची जागा भाजपा लढविणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

भाजपाची मागणी आणि आमदार सुनिल शेळकेंकडून युती धर्माची आठवण –
भाजपा हा राज्यात महायुतीतील घटकपक्ष आहे, यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस हाही घटकपक्ष आहे. मावळ विधानसभेत महायुतीच्या घटकपक्षाचे विद्यमान आमदार आहेत, अर्थात राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके. दुसरीकडे भाजपाने मावळ विधानसभा निवडणूक लढवण्याची केलेली घोषणा म्हणजे आमदार सुनिल शेळके यांना आणि त्यांच्या उमेदवारीला दिलेले खुले आव्हान आहे. यासर्व गोष्टींबद्दल आमदार सुनिल शेळके यांनी देखील आपली भुमिका स्पष्ट केली असून त्यांनी थेट महायुती म्हणून काही गोष्टींचा जाहीर खुलासा केला आहे.

Novel NIBR Ads

आमदार शेळकेंना सांगितला महायुतीचा बेसिक फॉर्म्युला –
आमदार सुनिल शेळके यांनी या प्रकरणी बोलताना, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराच शंभर टक्के प्रामाणिक काम केले. त्याच्यावर कुणी शंका घेत असेल आणि आम्हाला जागा मिळावी म्हणून आग्रह करत असेल तर योग्य नाही. अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत सुनिल शेळकेंनी महायुतीचा विधानसभेसाठीचा बेसिक फॉर्म्युला जाहीर केला. ‘ज्या पक्षाचा आमदार, त्याच पक्षाच्या वाट्याला ती विधानसभा’ असा महायुतीचा बेसिक फॉर्म्युला असून महायुतीत तसं ठरल्याचे शेळके यांनी सांगितले. आमदार सुनिल शेळके यांच्या या प्रतिक्रियेनंतर मावळ भाजपाची चांगलीच कोंडी झाली आहे.

मावळ विधानसभा ठरणार कळीचा मुद्दा –
राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे तीन पक्षांचे अर्थात महायुतीचे सरकार अस्तित्वात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत महायुतीला मोठा फटका बसला, महाविकासआघाडीपुढे महायुती नापास झाल्याचे दिसले. तरीही आगामी विधानसभा महायुती म्हणून एकत्र लढण्याचे संकेत तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी दिले आहेत. असे असताना मावळ विधानसभेतील राजकीय वादळ हे महायुतीत कळीचा मुद्दा ठरू शकते. मावळप्रमाणेच इतर अनेक विधानसभा क्षेत्रात अशीच परिस्थिती असून ही महायुती विधानसभेला नसेल, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. असे झाल्यास मावळचे चित्र काय असेल, हे वेगळे सांगायला नको.

अधिक वाचा –
– मावळ भाजपाचं नेमकं काय सुरूये ? एकाचवेळी ‘विजयी संकल्प’ आणि ‘त्याग’ समर्पणाची भुमिका, कार्यकर्ते देखील ‘कन्फ्यूज’
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतली ‘तालुकास्तरीय आढावा बैठक’, ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा
– दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

शिंदे सरकारकडून निर्णयांचा सपाटा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले 10 मोठे निर्णय, वाचा एका क्लिकवर

Next Post

रस्ता खचला ! मुसळधार पावसामुळे पवन मावळातील कोळे-चाफेसर रस्त्याची दुरवस्था । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
road in bad condition maval

रस्ता खचला ! मुसळधार पावसामुळे पवन मावळातील कोळे-चाफेसर रस्त्याची दुरवस्था । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.