स्व. दिलीपशेठ शोभाचंद टाटिया यांच्या स्मरणार्थ ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे/खामशेत यांच्या वतीने ‘गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. कामशेत येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्याला मावळचे आमदार सुनिल शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. ( Meritorious Student Award Ceremony Concluded At Kamshet Prize Distribution By MLA Sunil Shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल ग्रामस्थांनी दिलेली कौतुकाची थाप ही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पाठबळ देणारी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता अफाट आहे. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर अनेक यशोशिखरे नक्कीच गाठता येतात. फक्त त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी योग्य दिशा मिळण्याची गरज असते. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी उज्वल यश संपादन करु शकतो,’ असे यावेळी मनोगतात आमदार शेळकेंनी म्हटले.
स्व.दिलीपशेठ शोभाचंद टाटिया यांच्या स्मरणार्थ ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे/खामशेत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळ्यास कामशेत येथे उपस्थित होतो. pic.twitter.com/cxvhiu9bUm
— Sunil Shelke (@shelkesunilanna) February 4, 2023
सदर कार्यक्रमाला आमदार शेळकेंसमवेत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, माजी सरपंच अनंता घुले, बाळासाहेब गायकवाड, तानाजी दाभाडे, गजानन शिंदे, संतोष कुंभार, महेश शेट्टी, सरपंच रुपेश गायकवाड, उपसरपंच विमल पडवकर, विष्णू गायखे, कोंडीबा रोकडे सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, शिक्षक वृंद, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कुसगाव आणि कदमवाडी येथील साकव पुलांसाठी 1 कोटी 20 लाख रुपये
– पै विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध, अध्यक्षपदी शरद शेलार, वाचा सविस्तर