चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या नागाथली (ता. मावळ) येथील 56 वर्षीय चंद्रशेखर नथुराम खांडभोर यांचा मृतदेह आढळून आला आहे. वडगाव मावळ पोलिस ठाण्यात याप्रकरणी सी.आर.पी.सी. 174 प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कान्हे येथील 61 वर्षीय महिलेने याबाबत वडगाव मावळ पोलिसांत फिर्याद दिली. चंद्रशेखर नथुराम खांडभोर (वय 56 वर्षे, रा. नागाथली ता. मावळ, जि. पुणे.) असे सदर मयत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव मावळ पोलिसांत सदर व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. त्यामुळे बेपत्ता असल्यापासून दिनांक 22 सप्टेंबर 2023 सकाळी 11 ते दिनांक 25 सप्टेंबर 2023 दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असावा. मौजे सावळा गावच्या हद्दीत (ता मावळ जि पुणे) कळकराई येथील दरीत पडून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याची माहिती पोलिस फिर्यादीत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चंद्रशेखर खांडभोर यांच्या नातेवाईक महिलेने याबाबत वडगाव पोलिसांत फिर्याद दिली. ज्यात त्यांचा भाऊ चंद्रशेखर नथुराम खांडभोर हे हरवले असल्याची तक्रार महिलेने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात अगोदरच दिली होती. दिनांक 25 सप्टेंबर सायंकाळी 4 च्या सुमारास सावळा गावच्या पोलीस पाटलांकडून चंद्रशेखर खांडभोर हे कळकराई येथील दरीत दगडामध्ये मृत अवस्थेत दिसल्याचे समजले, अशी माहिती त्यांना मिळाली.
त्यानंतर नातेवाईक आणि गावातील ग्रामस्थ, पोलिस पथक घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर व्यक्ती हा बेपत्ता चंद्रशेखर नथुराम खांडभोर असल्याची ओळख पटवण्यात आली. फिर्यादी यांच्या भावाला ट्रेकिंग, झऱ्यात अंघोळ करणे याची आवड होती. त्यात डोक्यावर डोंगरावर दरड कोसळून त्यातील दगडांमुळे चंद्रशेखर यांच्या डोक्याला मार लागल्याचे आणि जखम झाल्याचे दिसून आले, तसेच दोन तीन दिवसात मृतदेह पाण्याने भिजल्याने फुगलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे फिर्यादीत नमुद आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार कदम करत आहेत. वडगाव मावळ पोलिस स्टेशनकडून ही माहिती देण्यात आली आहे. ( missing person from nagathali body found at savala death reported in vadgaon maval police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– चोरांचा सुळसुळाट! कातवी गावाच्या हद्दीतील बांधकाम साईटवर तब्बल 1 लाख 43 हजाराची चोरी
– साहेब…एखादा पुर्णवेळ माणूस द्या!! ‘6 महिने झाले ग्रामविकास अधिकारी नाही..’, खडकाळे ग्रामस्थांच्या उपोषणाची जिल्ह्यात चर्चा
– माळवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पल्लवी मराठे बिनविरोध । Maval Politics