तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीकडून पाईपलाईन करिता रस्त्याचे खोदकाम केल्याने याची चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीकडून शहरात पाईपलाईन करिता रस्त्याचे खोदकाम सुरु आहे. खोदकाम करण्यात आलेले सदर रस्ते अत्यंत सुस्थितीतील असून नव्यानेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती महानगरोत्थान योजनेअंतर्गत रस्त्यांची सुधारणा केलेली आहे. परंतु सदर खोदकामामुळे रस्त्यांची दुरावस्था होत असून शासन निधीचा मोठा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या असल्याचे आमदार शेळके यांनी म्हटले आहे. ( MLA Sunil Shelke demand to investigate excavation of Maharashtra Natural Gas Limited Company at Talegaon Dabhade )
‘या कंपनीस आचारसंहिता काळात रस्ते खोदण्याची परवानगी दिली आहे अथवा नाही, याची चौकशी करण्यात यावी. त्याचप्रमाणे सदर खोदकामाची संबंधित कंपनीने रॉयल्टी भरली आहे का ? तसेच दुरावस्था झालेल्या रस्त्यांची सुधारणा करणेबाबत ठेकेदाराने जबाबदारी घेतली आहे किंवा कशी ? याबाबत चौकशी करण्यात येऊन सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा. तसेच शासन निधीचा अपव्यय करणाऱ्या दोषींवर उचित कारवाई करण्यात यावी,’ अशी विनंती आमदार सुनिल शेळके यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
पंचवटी कॉलनी परिसरातील डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर खोदकाम करण्यात आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांची आमदार सुनिल शेळके यांनी उपलब्ध केलेल्या निधीतून डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा रस्ते खोदल्यामुळे शालेय विद्यार्थी, नागरिक यांना पुन्हा त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी कोण करणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
अधिक वाचा –
– ‘प्रत्येकाच्या मनात मशाल हे एकच चिन्ह असायला हवं.. या मशालीने भाजपाला तडीपार करायचंय’ – आदित्य ठाकरे । Maval Lok Sabha
– मावळ लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांकडून शहरात शक्ती प्रदर्शन ! Kamshet News
– ‘मी मॅच फिक्सिंग करत नाही…’ संजोग वाघेरेंसोबत ‘तेव्हा’ नेमकं काय झालं? अजितदादांनी सर्वांसमोर स्पष्ट केलं, वाचा… । Maval Lok Sabha