मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ‘आढावा बैठक’ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बापूसाहेब भेगडे यांचा ‘सत्कार समारंभ’ वडगाव मावळ येथे संपन्न झाला. या आढावा बैठकीला राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी मार्गदर्शन केले. आमदार सुनिल शेळके यांसह पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, इतर जेष्ठ मान्यवर, पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, युवा सहकारी व महिला-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
“पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समाजातील प्रत्येक घटकाचा पक्ष आहे. त्या सर्व समाज घटकापर्यंत पोहोचणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आदरणीय अजितदादांनी आपल्या मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरपुर निधी दिला आहे. त्यातील अनेक कामे पुर्ण झाली आहेत, तर काही कामे पूर्णत्वास येत आहेत. मावळच्या जनतेचे हित लक्षात घेऊनच ग्लास स्कायवॉक सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत आहे. माननीय अजितदादांचे आणि पक्षाचे कार्य व्यापक स्वरुपात मांडण्यासाठी बुथ निहाय काम करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे बूथ कमिट्या सक्षम करण्यावर विशेष लक्ष देण्यात यावे. त्यामुळे आपल्या पक्षाचा पदाधिकारी प्रत्येक घरापर्यंत जोडण्यास मदत होईल,” असे मत आमदार सुनिल शेळके यांनी मनोगतादरम्यान व्यक्त केले. (MLA Sunil Shelke expressed his belief that NCP MP will be elected in Maval Lok Sabha constituency)
मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादी सज्ज?
दरम्यान या आढावा बैठकीत मावळ लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने कंबर कसल्याचे दिसून आले. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून आढावा बैठका घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वडगावात मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आढावा बैठक झाली, यातून निवडणूकीची तयारी करण्यात येत असल्याचे दिसते. मावळ लोकसभेबाबत आमदार सुनिल शेळके यांनी स्पष्ट शब्दात भुमिका मांडली. ‘मी ठामपणे सांगतो आतापर्यंत राष्ट्रवादीचा खासदार मावळात झालाच नाही. जर मावळला राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेची तिकीट दिली तर दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून आणू,’ असा ठाम विश्वास आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा –
– मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची मासिक सभा संपन्न; संघटनेला बळकट करण्यासाठी हंगामी कार्यकारिणी जाहीर, वाचा अधिक
– मावळवासियांनो, पाणी जपून वापरा! पवना धरणात फक्त 56 टक्के जलसाठा, भविष्यातील ‘पाणीबाणी’ टाळण्यासाठी ‘ही’ गोष्ट नक्की करा । Pavana Dam
– लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र संस्थेला ‘दुर्ग रत्न’ पुरस्कार, सामाजिक कार्यातील उल्लेखनीय अन् आदर्शवत कार्यासाठी शिवदुर्गचा गौरव । Lonavala News