व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, February 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याचे आमदार सुनिल शेळके यांचे आदेश

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असलेल्या मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याचे आदेश आमदार सुनिल शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 26, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
mla-Sunil-Shelke

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


वडगाव मावळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असलेल्या मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याचे आदेश आमदार सुनिल शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांच्यासोबत झालेल्या संयुक्त बैठकीत आमदार सुनिल शेळके यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत येत असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामाचा आढावा घेतला. पाणी योजनांची सद्यस्थिती व गाव पातळीवरील अडीअडचणी, समस्या स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्याकडून जाणून घेतल्या.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत खडकाळा-कामशेत, डोणे-आढले, कार्ला, पाटण, कुसगाव-डोंगरगाव या सर्व पाणीपुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध झालेला असुन कामे सुरु आहेत. या योजनांतर्गत येत असलेल्या कामशेत, दिवड, आढले, ओव्हळे, डोणे, कार्ला, देवघर, वेहेरगाव, दहिवली, वाकसई, शिलाटणे, पाटण, भाजे, सदापूर, औंढे, बोरज, मळवली, देवले, औंढोली, कुसगाव बु., डोंगरगाव या गावांमध्ये सद्यस्थितीत होणाऱ्या पाणी पुरवठ्याबद्दलची माहिती घेतली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अनेक वर्षांपासून या योजना प्रलंबित आहेत. या योजनांच्या कामातील दिरंगाईमुळे ग्रामस्थांसह महिला-भगिनींना देखील मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. सद्यस्थितीत या गावांमधील पाणीपुरवठ्याचे स्त्रोत काय आहेत, कशा पद्धतीने पाणीपुरवठा केला जातो, किती पाणी उचलण्यात येते व पाणीपुरवठ्याचे नियोजन कशा पद्धतीने होत आहे याचे मूल्यमापन करुन सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचना आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

तसेच ग्रामस्थांची पाणी समस्या दूर करण्यासाठी नव्याने काम सुरु झालेल्या पाणी योजनांच्या कामांना गती देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना यावेळी दिले. याबैठकीस माजी पं. स. सदस्य दिपक हुलावळे, कार्यकारी अभियंता पी. सी. भांडेकर, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, अभियंता राजेश कुलकर्णी, धनंजय जगधने, वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता राहुल गव्हाणकर तसेच ग्रामसेवक, सरपंच, सदस्य, ग्रामस्थ आदी. उपस्थित होते. ( MLA Sunil Shelke Gave order to accelerate work of regional water supply schemes in Maval taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– घरगुती गौरी सजावट स्पर्धेत सुप्रिया चौधरी प्रथम । Talegaon Dabhade
– चोरांचा सुळसुळाट! कातवी गावाच्या हद्दीतील बांधकाम साईटवर तब्बल 1 लाख 43 हजाराची चोरी
– साहेब…एखादा पुर्णवेळ माणूस द्या!! ‘6 महिने झाले ग्रामविकास अधिकारी नाही..’, खडकाळे ग्रामस्थांच्या उपोषणाची जिल्ह्यात चर्चा


Previous Post

नागाथली येथील ‘त्या’ बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ! झऱ्याखाली जखमी होऊन मृत्यू झाल्याचा अंदाज

Next Post

‘पोरी जरा जपून’ व्याख्यानाला उदंड प्रतिसाद; विद्यार्थीनी आणि महिला-भगिनींची लक्षणीय उपस्थिती । Pavananagar

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vijaya-Marotkar-Lecture

'पोरी जरा जपून' व्याख्यानाला उदंड प्रतिसाद; विद्यार्थीनी आणि महिला-भगिनींची लक्षणीय उपस्थिती । Pavananagar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक ; सोमाटणे फाटा येथील भीषण अपघातात तरूणाचा मृत्यू

February 11, 2026
Chandrashekhar-Bawankule

जमिनीच्या वादाबाबत सुनावणीसाठी पक्षकारांना नोटीस बजावण्यासाठी इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार

February 11, 2026
corona-warriors

कोरोना काळात कर्तव्यावर मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत तातडीने देण्याचे निर्देश

February 11, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ योजनेस मंत्रिमंडळाची मान्यता – जाणून घ्या योजनेबद्दल

February 11, 2026
Megha Bhagwat thank-you tour in Induri-Varale ZP group Maval

मेघा भागवत यांचा इंदुरी-वराळे गटात आभार दौरा ; पराभवाने खचून न जाता सदैव लोकसेवेत राहण्याचा दिला विश्वास

February 11, 2026
Scholarship workshop for teachers in Maval taluka concluded 288 teachers from across taluka attended

Talegaon Dabhade : मावळ तालुक्यातील शिक्षकांची शिष्यवृत्ती कार्यशाळा संपन्न ; तालुकाभरातून २८८ शिक्षक उपस्थित

February 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.