आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांनी आंदर मावळमधील अत्यंत दुर्गम भागातील शेवटचे टोक असणाऱ्या कळकराई ( Kalkarai Village ) गावामध्ये दिवाळी सणाचे औचित्य साधून भेट दिली. आमदार शेळकेंनी या गावात जात तेथील ग्रामस्थांसोबत दिवाळी सण साजरा केला तसेच ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कळकराई ग्रामस्थांनी घरावर गुढी उभारुन आणि मिरवणूक काढून आमदार शेळकेंचे स्वागत केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
माझ्या मावळ मतदारसंघातील अत्यंत दुर्गम भागातील शेवटचे टोक असणाऱ्या #कळकराई गावामध्ये दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज सहकाऱ्यांसमवेत गेलो होतो. ग्रामस्थांनी घरावर गुढी उभारुन व मिरवणूक काढून आमचे स्वागत केले.आपुलकीच्या या आदरातिथ्याने pic.twitter.com/xd4QLs2d5I
— Sunil Shelke (@shelkesunilanna) October 28, 2022
कळकराई हे गाव मावळ तालुक्यातील आंदर मावळ विभागातील अत्यंत टोकाला असलेले दुर्गम खेडेगाव आहे. या गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर आजही अनेक समस्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक रस्ते, पाणी, वीज अशा मुलभुत सुविधांपासून वंचित राहिले आहेत. या सर्व समस्यांचा पाढा येथील ग्रामस्थांनी आमदार शेळकेंसमोर मांडला.
येत्या काळात येथील मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न, भविष्याचा प्रश्न आणि स्थानिकांच्या आरोग्य सेवासुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार शेळकेंनी उपस्थितांना दिले.
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा, सचिनभाऊ भाडाळे प्रतिष्ठान वाघोली संघाचा प्रथम क्रमांक
– भयंकर! पती-पत्नीच्या भांडणात पत्नीचा मृत्यू, तळेगाव दाभाडेतील घटना