पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी देशातील सर्व मंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवावे असे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहानाला प्रतिसाद देत मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शनिवारी) चिंचवड येथील श्रीमान महासाधू मोरया गोसावी मंदिरात स्वच्छता मोहिम राबविली. मंदिर परिसर स्वच्छ धुवून काढला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आमदार उमा खापरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नारायण लांडगे या मोहिमेत सहभागी झाले होते. अयोध्येमध्ये २२ जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील सर्व मंदिरांची सफाई करून मंदिराना विद्युत रोषणाई केली जाणार आहे. मंदिरे विद्युत रोषणाईने झळाळणार आहेत. ( MP Shrirang Barane cleaned Morya Gosavi temple premises chinchwad )
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर राष्ट्रार्पण व श्रींची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी होत आहे. हा दिवस भारतीयांसाठी गौरवाचा आणि उत्सवाचा आहे. संपूर्ण देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. प्रभू श्रीराम मंदिरामध्ये अवतरणार असल्याच्या क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभणार आहे. सोमवारी सर्वांनी दिवाळी साजरी करावी.
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी! कामशेतमध्ये होणार तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांची कार्यालये, ‘या’ 9 गावांतील नागरिकांना मोठा दिलासा । Maval News
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावांतील शेतकरी होणार करोडपती? पुणे रिंगरोडबाबत महत्वाची माहिती । Pune Ring Road
– ‘आमचा खंड्या गेला नाही, तो कायम डोळ्यासमोर राहणार’, गाडामालकाने बांधली लाडक्या बैलाची समाधी, दहाव्याला उठल्या पंगती । Maval News