नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे पवना शिक्षण संकुल पवनानगर येथे नुकत्याच नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृति नाट्यछटा स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी प्राथमिक फेरीमध्ये संकुलातील एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये पवना शिक्षण संकुलातील मुलांनी घवघवीत यश संपादीत केले आहे. ( Natshrestha Avinash Deshmukh Smriti Natya Chhata Competition Concluded At Pavana Education Sankul Pavananagar )
नाट्यछटा फेरीचा निकाल पुढीलप्रमाणे;
गट क्रमांक १ ( इयत्ता १ व २)
कु. गायकवाड ओवी रुपेश
गट क्रमांक २(इयत्ता ३ व ४)
कु.ठाकर शिवांजली संतोष
गट क्रमांक ३इयत्ता (५ ते ७ )
चि. आदित्य अजित कुंभार
चि. पडवळ सक्षम संतोष
चि. सुतार रुद्र संतोष
गट क्रमांक ४(इयत्ता ८ व ९)
कु भालेराव खुशी अनंता
वरील सर्व गटातील विद्यार्थी पुणे येथे होणाऱ्या अंतिम फेरीला पात्र झाले आहेत.
तर उत्तेजनार्थ बक्षिसे
कु. ठाकर आरोही रवी
कु. साबळे श्रुती सचिन
कु. पडवळ सिद्धी योगेश
कु. ठाकर पूर्वा उमेश
कु. कालेकर सानिका संतोष
चि. माने शंकर बाबासो
हेही वाचा – मावळ गोळीबार घटनेची 12 वर्षे! पवनानगर इथे शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण, भाजपकडून जलवाहिनीबद्दल भुमिका स्पष्ट
नाट्यछटा स्पर्धा प्राथमिक फेरीमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक न देता पात्र विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर संधी देण्यात आली आहे. या नाट्यछटा स्पर्धेचे परिक्षक म्हणून विश्वास देशपांडे आणि पुजा डोळस यांनी काम पाहिले. सदर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांंना पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, परीक्षक विश्वास देशपांडे, पूजा डोळस, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनिल बोरुडे, शिक्षक प्रतिनिधी अमोल जाधव सर, गणेश साठे, गणेश ठोंबरे, राजकुमार वरघडे, सुवर्णा काळडोके यांंच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
तसेच जिल्हास्तरावर सादरीकरणाची संधी प्राप्त झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे यांनी अभिनंदन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन वैशाली वराडे मॕडम, रोशनी मराडे मॕडम, संजय हुलावळे सर, अमोल जाधव सर, पल्लवी दुश्मन मॕडम, पुनम दुश्मन मॕडम, रत्नमाला आडकर मॕडम, स्वाती आडिवळे मॕडम, कांचन जाधव मॕडम यांनी केले. ( Natya Chhata Competition Concluded At Pavana Education Sankul Pavananagar Maval Education News )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अभिनंदन कबीर! वडगावच्या सुपुत्राचे जेईई परीक्षेत उज्वल यश । Vadgaon Maval
– पुणे जिल्ह्यात 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर । Lok Adalat
– ब्रिटिशांची जुलमी राजवट दूर करुन भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देणारे ‘क्रांतिकारक हेच देशाचे खरे हिरो’ – व्याख्याते विवेक गुरव