दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या प्रलयकारी भूकंपातून सावरत असलेले तुर्की आणि सिरिया देश सोमवारी (20 फेब्रुवारी) रात्री नव्याने झालेल्या भूकंपाने पुन्हा एकदा हादरले आहेत. तुर्की ( Turkiye News ) आणि सिरीया ( syria News ) या देशांच्या सीमेवर हाते (Hatay) प्रांतात भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ही साधारण 6.4 रिश्टर स्केल इतकी होती, अशी माहिती समोर येत आहे. तसेच समोर आलेल्या माहितीनुसार या भूकंपात अतापर्यंत 8 जणांचे बळी गेले असून 200 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या भूकंपामुळे तुर्की आणि सिरिया हे देश अक्षरशः उद्वस्त झाले आहेत. सर्वाधिक नुकसान हे तुर्कीचे झाले असून हा देश पुर्णतः ढासळला आहे. एकापाठोपाठ एक झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे इथे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झालीये. आतापर्यंत या भूकंपात 46 हजारांहून अधिक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. भारतासह जगातील अनेक देश तुर्की आणि सिरियाला मदत करत आहे. ( New 6.4 Magnitude Earthquake Hits Turkiye Hatay Province Devastated By Massive Tremor 2 weeks ago )
भूकंपाच्या आघातातून सावरत असलेल्या तुर्की, सिरियात सोमवारी रात्री नव्याने भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक प्रचंड भयभीत झालेत.
अधिक वाचा –
मोठी बातमी! प्रसिद्ध गायक सोनू निगमवर मुंबईत हल्ला, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
सुदुंबरेतील सिद्धांत कॉलेजमध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमावेळी किरकोळ कारणावरुन तुफान राडा, 9 जणांवर गुन्हा