वडगाव नगरपंचायत ( Vadgaon Nagar Panchayat ) हद्दीतील प्रभाग क्रमांक 17 येथील भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प होत असताना या परिसरात कामगार वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणावर स्थायिक होत आहेत. परंतू प्रभागातील या भागाची विशिष्ट ओळख अद्याप नव्हती. त्यामुळे या परिसरातील जेष्ठ नागरिक, महिला वर्ग, बच्चे कंपनी तसेच महत्वाचे म्हणजे बाहेरून येणाऱ्या कुरिअर एजन्सी कामगार, गॅस सिलिंडर बुकिंग वाहन, नातेवाईक मंडळी, शहरातील पोस्टमन आदींना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच, अत्यावश्यक सेवाही पोहोचण्यास विलंब होत होता, त्यामुळे या सर्व अडचणीचा विचार करून सोसायटीतील सर्व सभासद यांच्या समवेत चर्चा विनिमय करून या परिसराचे नामकरण करण्यास एकमताने अनुमोदन देण्यात आले. ( New Name For Area in Vadgaon City Nagar Panchayat Ward No 15 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानुसार या परिसराचे श्री चिंतामणी नगर ( shri chintamani nagar ) असे नामकरण नगराध्यक्ष मयूर ढोरे ( mayor mayur dhore ) आणि सर्व स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी श्री चिंतामणी नगर परिसरातील जेष्ठ नागरिक, सर्व सोसायटी सदस्य, फ्लॅट धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सोसायटीच्या आरक्षित असलेल्या ओपन स्पेस या मोकळ्या जागेत लवकरच वृक्षारोपण आणि सुशोभिकरण करण्यात येईल. वडगाव शहर बाजारपेठ भागापासून थोड्या दूर पण हाकेच्या अंतरावर असलेल्या या परिसरात दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून या भागातील प्रलंबित असलेली विकासकामे पूर्ण केली जाणार आहे, असे आश्वासन नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी चिंतामणी नगर मधील नागरिकांना दिले. ( Chintamani Nagar Vadgaon Nagar Panchayat Maval )
अधिक वाचा –
– इंदोरी ग्रामपंचायतीसाठी भाजपाने कंबर कसली I Gram Panchayat Election
– कालभैरव जयंती कार्तिक उत्सवानिमित्ताने वडगावमध्ये ज्ञानामृत सोहळा I Vadgaon Maval