राज्य निवडणूक आयोगाने राज्यभरातील 7751 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात पुणे जिल्ह्यात एकूण 221 ग्रामपंचायतींच्या निवडणूका असून त्यात मावळ तालुक्यातील 9 ग्रामपंच्यातींचा समावेश आहे. मावळमधील 9 पैकी 1 इंदोरी ग्रामपंचायतीसाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसल्याचे दिसत असून त्यादृष्टीने पक्षाकडून कार्यक्रम आणि नियोजन होताना दिसत आहे. ( Maval BJP Meeting For Indori Gram Panchayat Election )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली इंदोरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूकीच्या अनुषंगाने रणनितीवर चर्चा झाली. सदर बैठकीला इंदोरी गावातील भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष यांच्यासह महिला भगिनी आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– आमदार शेळकेंच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींची आढावा बैठक संपन्न
– पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून बाळा भेगडेंवर मोठी जबाबदारी !