जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे अर्थात भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेवा पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांनी मोदींची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी आषाढी वारीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती पंतप्रधानांना भेट देण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भेटी दरम्यान मोदींनी महाराष्ट्रातील विकास कामांचा आढावा घेतला आणि विविध विषयांवर साधारण अर्धा तास चर्चा केली. चर्चेमध्ये लोकहितासाठी योग्य ते मार्गदर्शन केले व महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी जनतेला आणि सर्व लोकप्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या. ( Newly elected MPs of Shiv Sena and NCP met Prime Minister Narendra Modi )
यावेळी आयुष व आरोग्य राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, खासदार संदिपान भुमरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार रविंद्र वायकर, खासदार नरेश म्हस्के, खासदार मिलिंद देवरा व राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी बदलल्या, आता अर्ज करणे झाले सोपे, वाचा सविस्तर
– इंद्रायणी नदीवरील पूल, नवीन मतदार यादी, लाडकी बहीण योजना यांबाबत रवींद्र भेगडे यांचे तहसीलदारांना निवेदन । Vadgaon Maval
– भुशी धरण परिसरातील कारवाईला तात्पुरती स्थगिती ; स्थानिक व्यावसायिकांवर अन्याय होऊ देणार नाही – आमदार सुनिल शेळके