Dainik Maval News : रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त “दृश्यशक्ती ट्रस्टच्या” दिव्यांग कलाकारांनी देशभक्तीपर गीत आणि नृत्याचा कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. खोपोली शहरातील लायन्स क्लब सभागृहात आयोजित केलेल्या भव्यदिव्य कार्यक्रमात शेकडो प्रेक्षकांनी दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या कलागुणांना मनसोक्त दाद दिली. गणेश वंदनेने सुरुवात झालेल्या कार्यक्रमाची “ए मेरे वतन के लोगो” या सुमधुर गीताने सांगता झाली.
- मा. राजेश खंदारे – प्रथम वर्ग न्यायाधीश, खालापूर, मा. सोमनाथ घार्गे – पोलीस अधीक्षक रायगड, मा. विक्रम कदम – उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर, लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष दीपेंद्र बदोरिया, शॉलम एज्युकेशन ट्रस्टच्या श्रीमती पाटणकर यांच्या प्रमूख उपस्थितीत खालापूर तालुक्यातील खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितल राऊत, खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि रसायनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.
खोपोली शहरातूनच नव्हे तर संपूर्ण रायगडातून पोलीस अधिकारी त्याच प्रमाणे अनेक मान्यवर संस्था आणि रसिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
गीता पोडवाल – संस्थापक अध्यक्ष दृश्यशक्ती ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली “हम किसीसे कम नही” या रंगारंग कार्यक्रमाची मांडणी केली होती. दिव्यांग कलाकारांच्या कलागुणांच्या अविस्मरणीय सादरीकरणाने अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटले, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. विक्रम कदम उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले तर सूत्रसंचालकाची भूमिका जगदीश मरागजे यांनी पार पाडली. या अविस्मरणीय कार्यक्रमानंतर रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे दृश्यशक्ती ट्रस्टला रू.225000/- आणि शॉलम एज्युकेशन ट्रस्टला रू.25000/- देणगी स्वरूपात दिले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा ! महाराष्ट्रातील चौदा जणांचा समावेश ; मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री
– महाराष्ट्रातील 48 पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक – पाहा यादी
– महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर, देशात एकूण 49 व्यक्तींना मिळणार पुरस्कार – पाहा यादी