गेले काही दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी काहीशी विश्रांती घेतली. त्यामुळे पवना धरण परिसरातील नागरिकांनीही मोकळा श्वास घेतला. पाऊस ओसरल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. भातखाचरात समाधानकारक पाणी असल्याने शेतकरी भातलागवडीची घाई करत आहेत. सोमवारी पावसाचे प्रमाण कमी झाले तरीही शनिवार-रविवार झालेल्या पावसाने ओढे, प्रवाह जोरात वाहत असून पाण्याची आवक सुरूच असल्याने पवना धरणातील पाणीसाठाही वाढला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मंगळवारी सकाळी 6 वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरणातील पाणीसाठा 34 टक्क्यांच्या पार गेला आहे. सोमवारी 24 तासात अवघा 1 मीमी पाऊस नोंदवण्यात आला. तरीही पवना धरणातील पाणीसाठा 33.27 टक्क्यांवरून थेट 34.11 टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला पवना धरणात 32.43 टक्के इतका पाणीसाठा होता. याचा अर्थ यंदा उशीर सुरूवात करूनही पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. पवना परिसरात चांगला पाऊस झाल्याने गतवर्षीपेक्षा आजमितीस धरणात अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. याच प्रमाणात पावसाचा रंगरूप राहिल्यास धरणही लवकर भरू शकते. यामुळे मावळ तालुक्यातील हजारो शेतकरी, नागरिक यांसह पिंपरी चिंचवड शहरवासीयांची चिंता मिटली आहे. ( Pavana Dam Rainfall Updates 34 percent water storage July 2024 )
अधिक वाचा –
– ‘हे महादेवा शक्ती दे, लोहगडला मुक्ती दे’ , किल्ले लोहगडावरील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी, बजरंग दलाचा अल्टिमेटम । Lohgad Fort
– जागतिक साप दिन : मावळ तालुक्यात आढळतात 37 प्रकारचे साप, त्यातील 8 साप आहेत विषारी । World Snake Day
– मावळ तालुक्यातील शिरदे गावात बिबट्याला पकडण्यात यश, उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्रात रवानगी