पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट क्रमांक ५ यांनी तळेगाव दाभाडे आणि कामशेत भागात जबरदस्त कामगिरी करत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) मधील 07 आरोपींना तळेगाव दाभाडे आणि कामशेत येथून ताब्यात घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ( Police succeeded in arresting 7 persistent criminals in Mcoca Act from Talegaon Dabhade and Kamshet areas )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे पोलिस पथक तयार करुन काही आरोपींचा शोध घेत होते. यावेळी पोलिसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती होती मिळाली की, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद असलेल्या भा.दं.वि.क. ३०२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०६, १२० ( ब ) भा.ह.का. ४ (२५), म.पो.का.क.३७ (१) (३) १३५ सह फौ. सु. अधि.क ७ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३ (१) (i) (ii), ३ ( ४ ) मधील पाहिजे असलेला आरोपी रोहीत शिवपुत्र कांबळे ऊर्फ सोनकांबळे हा जिजामाता चौक तळेगाव दाभाडे येथे आला आहे.
पोलिसांना अशी माहिती मिळताच पोलीस स्टाफ पथक पेट्रोलींग करत असलेल्या खाजगी वाहनाने सदर ठिकाणी गेले, तेव्हा पोलीस पथकास पाहून सदर व्यक्ती गल्लीबोळातुन पळुन जावु लागला. तेव्हा पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने त्याला पाठलाग करुन पडकले. त्याची चौकशी केली असता त्याने स्वतःचे नाव; १) रोहीत शिवपुत्र कांबळे ऊर्फ सोनकांबळे (वय १९ वर्षे रा. संभाजीनगर तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे) असे सांगितले आणि गुन्ह्याबाबत कबुली दिली.
त्यानंतर त्याच्याकडे सदर गुन्ह्यातील इतर आरोपी नामे संकेत मडीखांबे, हर्षल धुमाळ ,ऋतिक शिंदे, यांच्या बाबत कसून चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडून मिळालेल्या माहितीचे आधारे पोलीस उप-निरीक्षक राहुल कोळी आणि पोलीस पथकाने आरोपी,
२) संकेत लहु मडिखांबे (वय २१ वर्षे रा. जिजामाता चौक तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे)
३) हर्षल विठ्ठल धुमाळ (वय २२ वर्षे रा. घर नंबर ६५२३ रंजितसिंह कॉलनी तळेगाव दाभाडे)
४) ऋतिक गोरख शिंदे (वय २२ वर्षे रा. भगिनी बॅकेजवळ, संभाजीनगर, तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे)
५) ०१ विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेतले.
हेही वाचा – अहिरवडे फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सांबराचा मृत्यू
तसेच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद असलेल्या भा.दं.वि.क. ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, भा.ह.का. ४ (२५), म.पो.का.क.३७ (१) (३) १३५ सह फौ. सु. अधि क ७ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३ (१) (i) (ii). ३ (४) मधील पाहिजे असलेल्या आरोपी ६) शन्या ऊर्फ शाम सुभाष कांबळे (वय १९ वर्षे रा. भेगडे आळी लाकडाच्या वखारी जवळ तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे) यालाही ताब्यात घेतले. असे एकूण ०५ आरोपी व ०१ विधिसंघर्षीत बालक तळेगाव दाभाडे व परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
तसेच दिनांक २९ मार्च २०२३ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट-५ पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन एका पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेत असतांना पोलिसांनी मिळालेल्या बातमीच्या आरोपी नामे निलेश खंडु गायखे (वय – ३५ वर्षे रा. मु.खामशेत पोस्ट कामशेत ता. मावळ जि. पुणे) यास कामशेत येथून ताब्यात घेण्यात आला. अशाप्रकारे मोक्का कायदा केस मधील पाहिजे वरील नमुद ०६ आरोपींना व ०१ विधिसंघर्षीत बालकाला पुढील कारवाई कामी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले.
अधिक वाचा –
– एक वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी शिल्लक; पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार! वाचा कारण सविस्तर
– शिलाटणे गावातील दिवंगत शिवभक्तांच्या कुटुंबीयांची युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली सांत्वनपर भेट