कामशेत शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे बाळकृष्ण राठी ह्यांच्या दुकानात प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन गुरुवार (दिनांक 27 जुलै) रोजी करण्यात आले. भाजपचे जेष्ठ नेते माऊली शिंदे ह्यांच्या हस्ते आणि मा सभापती संतोष कुंभार, सरचिटणीस हरिभाऊ दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मावळ विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे आणि आभार भाजपा शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी केले. ( Pradhan Mantri Kisan Samriddhi Kendra open at Kamshet Maval Taluka )
सदर कार्यक्रमात कुसगाव खुर्द गावच्या नवनियुक्त सरपंच मनिषा लालगुडे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा कामशेत शहर भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी देशभरातील किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. देशात तब्बल 2 लाख 8 हजार, यात महाराष्ट्रत 14 हजार, तर त्यातील पुणे जिल्ह्यामध्ये 650 आणि आपल्या मावळ तालुक्यात जवळपास 50 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचा समावेश आहे.
ह्या कार्यक्रमावेळी माजी सभापती राजाराम शिंदे, धनगर परिषद अध्यक्ष नामदेव शेडगे, भाजपा नेते अतुल कार्ले, संचालक बाळासाहेब गायखे, कामशेत उपाध्यक्ष रमेश बच्चे, ह.भ.प. सुरेश इंगुळकर, ज्ञानेश्वर लालगुडे, सिताराम काजळे, कामशेत सोशल मीडिया अध्यक्ष मानस गुरव, रुपेश सुतार, दुकानदार बाळकृष्ण राठी, लखन राठी आदी मान्यवर उपस्थित होते. ( Pradhan Mantri Kisan Samriddhi Kendra open at Kamshet Maval Taluka )
शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांची स्थापना
पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र ही शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करतील आणि शेतकऱ्यांना कृषीविषयक साहित्य (खते, बियाणे, अवजारे), मृदा, बियाणे आणि खते यांच्या तपासणीची सुविधा पुरवतील. तसेच ही केंद्रे सरकारच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतील. शेतकऱ्यांची शेतीसाहित्य, कृषी निविष्ठा, नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित शेतीविषयक माहितीचे आदान-प्रदान, त्यांच्या मालाची सुरक्षितता, पाश्चात्य देशात विकसित होत असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, शेतकरी जागरुकता, मार्गदर्शन, दळवणवळणाच्या पुरेशा सोईसुविधा यासंदर्भात गैरसोय होऊ नये, त्यांच्या सगळ्या प्रश्नांचे एकाच ठिकाणी उत्तर मिळावे, त्यांना सोईसुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशीचे आदेश द्या, अन्यथा आंदोलन करू…’, वाचा काय आहे प्रकरण
– माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळेतील मुलांना ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मोठी मदत
– ‘हॅलो! तुमचे विम्याचे पैसे आलेत पण….’ वयोवृद्धाची मोठी आर्थिक फसवणूक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल