पवनमावळात महाराष्ट्र शासन कृषि विभाग तालुका कृषि अधिकारी मावळ व मंडळ कृषि अधिकारी काले कॉलनी याच्या वतीने 10 हेकटर क्षेत्रावर व 25 लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात सन 2023-24 या वर्षात प्रकल्प विस्तार कार्यक्रम अंतर्गत “चारसूत्री भात लागवड प्रकल्प” घेण्यात आला. त्याच्या अनुषंगाने मौजे मळवंडी ठुले येथे शेतकऱ्यांना झिंक सल्फेट व कामगंध सापळे वाटप करून मार्गदर्शन कृषि सहाय्यक विकास गोसावी यांनी केले. ( propagation of four point method for increasing rice production in pawan maval area )
मौजे मळवंडी ठुले येथे कृषि विभागाकडून चारसूत्री पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येत आहे. भात प्रकल्प हा चारसूत्री लागवड पद्धतीवर आधारित असून त्यामध्ये स्थानिक शेतकऱयाच्या च्या माध्यमातून लाभार्थी शेतकरयाची निवड करण्यात आली असून यांच्या क्षेत्रावर हा प्रकल्प राबविला जात असून चारसूत्री प्रकल्पातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर 0.40 हे क्षेत्रावर प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी भात बियाण्यास बिजप्रक्रिया करून गादीवाफ्यावर रोपवाटिका करून दोरीच्या साहाय्याने 15 बाय 25 से.मी. अंतरावर भात लागवड केल्या आहेत. प्रकल्पा अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना कृषि विभागाकडून आझेटोबॅक्टर, पीएसबी, निमआर्क, ट्रायकोड्रामा, बांधावर लागवडीसाठी तूर बियाणे, झिंक सल्फेट, भात प्रात्यक्षिक प्लॉटला 30 कामगंध देण्यात आले आहे, असे कृषि सहाय्यक विकास गोसावी यांनी सांगितले. ( propagation of four point method for increasing rice production in pawan maval area )
हेही वाचा – मावळात 80 टक्के भात लागवडी पूर्ण; पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित शेतकऱ्यांचीही लवकरच ‘वाढऔंज’
“चारसूत्री पद्धतीत भात रोपे कमी लागत असून भात लावणीस कमी वेळ लागतो व बियाणे कमी लागल्यामुळे बियाणे खर्च ही कमी येतो. यूरिया ब्रिकेट खतामुळे भाताच्या उत्पादनात 2 ते 3 पट वाढ होणार असून कृषी विभागाच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा आम्हा शेतकरयाना निश्चितच फायदा होत आहे.” – दत्तात्रय तोंडे, प्रगतशील शेतकरी – मळवंडी ठुले
“सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविणे, आधुनिक तंत्रज्ञान प्रगतशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करणे ,उत्पादन खर्च कमी करणे, भात चारसूत्री पद्धत क्षेत्र वाढविणे. प्रकल्प राबविण्याचा मुख्य उद्देश आहे. चारसूत्री तज्ञ शेतकरी तयार करणे” – विकास गोसावी, कृषि सहाय्य्क, मळवंडी ठुले
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात उभे राहणार क्रीडा संकुल! आमदार सुनिल शेळके यांनी घेतली मंत्री संजय बनसोडे यांची भेट
– उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी महाराष्ट्र शासनाचा टाटा पॉवर सोबत करार; मावळ तालुक्यात ‘इथे’ होणार प्रकल्प