Dainik Maval News : “पैसा हे केवळ कल्पनेचे दारिद्र्य आहे,” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, वडगाव मावळ येथे आयोजित नूतनीकरण कामांच्या अनावरण सोहळ्यात ते बोलत होते.
ॲस्टेमो फाय कंपनीच्या CSR निधीतून सुमारे ३१ लाख रुपये खर्च करून विद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्व वर्गखोल्यांचे नूतनीकरण, संपूर्ण इमारतीचे रंगकाम तसेच लिकेज-फ्री काम करण्यात आले आहे. या कामांचे अनावरण चेअरमन चंद्रकांत दळवी व ॲस्टेमो फाय कंपनीचे डायरेक्टर सुधीरजी गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास प्लांट मॅनेजमेंट हेड ओरिकसा, क्वालिटी हेड श्रीकांत मापारी, एच.आर. हेड संपत फडतरे, कंपनी सेक्रेटरी हर्षवर्धन चिंधळे, अमर मगर, रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, विभागीय अधिकारी संजय मोहिते, सहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रय गायकवाड, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग भोसले, लाईफ वर्कर हिंगणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवीन नवघणे तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुधीर म्हाळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाचे प्राचार्य सतीश हाके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर संपत फडतरे यांनी कंपनी व्यवस्थापनाची भूमिका मांडली. यावेळी विद्यालयातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
आपल्या भाषणात चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे सांगितले. रयत शिक्षण संस्थेच्या सुमारे ६५० शाळांमध्ये ६५०० इंटरॲक्टिव पॅनल बोर्ड बसविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शालेय विकास आराखड्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. वडगाव मावळ चे विद्यालय हे माजी विद्यार्थी विकासाचे मॉडेल असल्याचे त्यांनी जाहीर केले.
वेळी माजी विद्यार्थी ललित शहा यांनी पूर्वीची आणि आत्ताची न्यू इंग्लिश स्कूल यामधील बदल अधोरेखित केला. श्रीकांत मापारी यांनी ‘घेता घेता देणारे कसे होता येईल’ यावर मार्गदर्शन केले. प्लांट मॅनेजमेंट हेड ओरिकसा यांनी विद्यार्थ्यांशी जपानी भाषेतून संवाद साधला, त्यावेळी योगेश गायकवाड यांनी दुभाषी म्हणून काम केले.
या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ भारावून गेले. सुधीरजी गोगटे यांनी शाळेच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यातही आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. निता शेटे-खोडदे यांनी केले, तर आभार जयश्री बोरसे यांनी मानले. यावेळी कलाशिक्षिका दिपा गुंजाळ यांनी चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या छायाचित्राची देखणी रांगोळी साकारली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गणेश शेंडगे , प्रवीण ढवळे, रूपाली बागबंदे, सविता मोरे, ज्योती भोसले, तानाजी गोडे, अरविंद ढाकणे, शिल्पा रोकडे, गणेश निकम व गिरीश गुजराणी यांनी सहकार्य केले. यावेळी गणेश विनोदे, शोभा वहिले, प्रशांत भिल्लारे, विठ्ठल खांडेकर, विजय टकले, पप्पू ढोरे, अतुल राऊत, बाळासाहेब तुमकर, शरद खांडभोर, कल्पेश भोंडवे, इ. माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. परिसरातील विविध शाखामधील मुख्याध्यापक या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल
– ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू
– मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती
– मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड