व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मतदारसंघातील विकासकामांचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर

सोशल मीडियाच्या वापराचा पंतप्रधान मोदींचा खासदार बारणेंना सल्ला

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 10, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Report on development works in constituency submitted to PM Narendra Modi by MP Shrirang Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मतदारसंघातील विकासकामांचा बारावा वार्षिक अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी भेट घेऊन त्यांना सादर केला. या भेटीदरम्यान मतदारसंघातील विविध प्रलंबित व पूर्ण झालेल्या विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली. हा अहवाल ई-बुकमध्ये तयार करून सोशल मीडियावर प्रसिद्ध करावा. सोशल मीडियाच्या वापराचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार बारणे यांना दिला.

खासदार श्रीरंग बारणे यांची ही तिसरी टर्म आहे. खासदार बारणे वर्षभरात केलेल्या कामांचा अहवाल दरवर्षी काढतात. तिसऱ्या टर्ममधील दुसरा आणि आतापर्यंतचा बारावा अहवाल आहे. हा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला. अहवाल स्वीकारताना पंतप्रधानांनी दरवर्षी अहवाल प्रसिद्ध करण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.विकासकामे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला.

विकासकामांचा अहवाल ‘ई-बुक’ (E-book) स्वरूपात तयार करून तो सोशल मीडियावर प्रसिद्ध करावा, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही माहिती सहज पोहोचू शकेल.

सुमारे २६ लाख एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या मतदारसंघात प्रत्येक नागरिकाशी थेट संपर्क ठेवणे कठीण असते. अशा वेळी सोशल मीडिया व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवणे सुलभ होते. सरकारच्या कल्याणकारी योजना व विकासकामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल व आधुनिक संपर्क माध्यमे अत्यंत प्रभावी ठरतात, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. या भेटीनंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात झालेली विकासकामे अधिक गतीने जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

अहवालात काय आहे?
मावळ लोकसभा मतदारसंघात केलेली विकास कामे, लोकसभेत सादर केलेली खासगी विधेयके, लोकसभेतील उपस्थिती, वर्षभरातील बैठका याचा सर्वलेखाजोखा अहवालात देण्यात आला आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली
– मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण
– ३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत


dainik maval jahirat

Previous Post

PHOTOS : मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Report on development works in constituency submitted to PM Narendra Modi by MP Shrirang Barne

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मतदारसंघातील विकासकामांचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर

August 10, 2026
World Tribal Day celebrated with enthusiasm in Maval Taluka

PHOTOS : मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण

August 10, 2026
sacrifice of martyrs who opposed Pavana closed pipeline remains an inspiration for ongoing struggle

पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली

August 10, 2026
Ashadhi Wari Sant Tukaram Maharaj Palkhi returned to Dehu village

३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत

August 10, 2026
Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.