साताऱ्याची ( Satara ) ऋतुजा टंकसाळे ( Rutuja Tanksale ) ही नवोदित अभिनेत्री ‘ प्रेम म्हणजे काय असतं ‘ ( Prem Mhanje Kay Asta ) या चित्रपटातून पदार्पण करत आहे. नव्या दमाच्या कलाकारांनी केलेला ‘प्रेम म्हणजे काय असतं’ हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रिक्षा चालकाची मुलगी बनली अभिनेत्री …
ऋतुजा टंकसाळे ( Actress Rutuja Tanksale ) ही साताऱ्याची तरुणी पहिल्यांदाच चित्रपटात अभिनय करत आहे. प्रेम म्हणजे काय असतं या चित्रपटात ऋतुजानं अपर्णा ही भूमिका केली आहे. ऋतुजाचे वडील रिक्षाचालक असून चित्रपटाची, अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातली ऋतुजा आपला पहिला चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने उत्साहात आहे. ( Rutuja Tanksale Information )
‘प्रेम म्हणजे काय असतं या चित्रपटातून मला खूप काही शिकायला मिळालं, चित्रपट हे माध्यम समजून घेता आलं. आता याच क्षेत्रात करिअर करायचं का हे ठरवलेलं नाही. पण संधी मिळाल्यास काम करायला नक्कीच आवडेल,’ असं ऋतुजानं सांगितले. ( Marathi Actress Rutuja Tanksale ) प्रेम म्हणजे काय असतं या चित्रपटातून निर्माते आणि दिग्दर्शकांनी अनेक नवोदित कलाकारांना या चित्रपटातून सुवर्ण संधी दिली आहे.
तख्त प्रॉडक्शनने ‘प्रेम म्हणजे काय असतं’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रसाद दत्तात्रय इंगवले यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी निभावली आहे. प्रेम ही संकल्पना अत्यंत वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे. उत्तम कथा, फ्रेश कलाकार, श्रवणीय संगीताचा मिलाफ या चित्रपटात झाला आहे. ( Rutuja Tanksale Rickshaw Driver Daughter From Satara Become Marathi Actress )
अधिक वाचा –
मुंबई-पुणे महामार्गावर मध्यरात्री विचित्र अपघात, ट्रक चालकाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, पाहा थरारक Video
PHOTO : आमदार सुनिल शेळकेंनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन, मावळवासियांसाठी केली प्रार्थना I नवरात्रोत्सव 2022