कुरवंडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी साधना सुमीत यादव यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायतीच्या मावळत्या उपसरपंच राजश्री कडू यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच अनिता कडू यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदासाठी निवड प्रक्रिया पुर्ण झाली. यावेळी निर्धारित वेळेत साधना यादव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी निवडीची घोषणा करण्यात आली. ग्रामसेवक उज्वला डावरे यांनी पीठासन अधिकारी म्हणून यावेळी काम पाहिले. ( Sadhana Yadav Elected Unopposed Deputy Sarpanch Of Kurwande Gram Panchayat )
साधना यादव यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड होताच त्यांचे समर्थकांनी एकच जल्लोष केला. तसेच त्यांना सन्मानित करुन अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विद्यमान सदस्य रोहित गायकवाड, सचिन कडू, सुप्रिया पडवळ, चंदाराणी राऊत, कविता ससाणे, रोहिणी केदारी उपस्थित होते.
तसेच, भाजपचे तालुका उपाध्यक्ष सखाराम कडू, माजी सरपंच रोशन ससाणे, आनंदनगर त्रिरत्न दीप सेवा संघ मंडळाचे अध्यक्ष कैलास भालेराव, माजी सरपंच दिलीप कडू, विशाल कडू, पोलिस पाटील प्रीतम ससाणे, सतू यादव, महेंद्र कांबळे, जितेंद्र राऊत, हरीश पडवळ, सागर ससाणे, सुमीत यादव, समाधान भालेराव, आनंद भालेराव, रोहित ससाणे, राजू कडू आदी उपस्थित होते. ( Sadhana Yadav Elected Unopposed Deputy Sarpanch Of Kurwande Gram Panchayat )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अत्यंत धक्कादायक बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या
– अखेर महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालाच..! काँग्रेसच्या हायकमांडने ‘या’ नेत्यावर सोपवली जबाबदारी
– लोणावळा स्टेशनसह देशातील तब्बल 1 हजार 309 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट । Amrit Bharat Station Scheme