तळेगाव दाभाडे येथील लिंब फाट्यावर तळेगाव वाहतूक विभाग आणि राज्य रस्ते विकास महामंडळ यांकडून अपघात प्रतिबंधक उपाययोजना म्हणून सेफ्टी बॅरिअर आणि चॅनेलायझर लावण्यात आले आहेत. ( Safety Barriers And Channelizers As Accident Prevention Measures By MSRDC At Limb Phata In Talegaon Dabhade )
तळेगाव दाभाडे लिंब फाटा इथे होणारे अपघात रोखण्यासाठी अपघात प्रतिबंध उपायोजना करण्याकरिता राज्य रस्ते विकास महामंडळास पत्र व्यवहार करुन पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर एमएसआरडीसी (MSRDC) यांचा वतीने सेव्ह लाईफ फाउंडेशन यांनी सर्वे करून अपघात प्रतिबंध उपायोजना प्लानिंग तयार केले. त्यानंतर उपाययोजना म्हणून सदर ठिकाणी सेफ्टी बॅरियर्स, चॅनेलायझर तसेच दिशादर्शक, स्पीड लिमिट, स्पीड ब्रेक रमलर्स, नो ओव्हरटेकिंग असे अनेक रोड सेफ्टी बोर्ड रस्त्याच्या दोन्ही बाजूस लावण्यात आलेत. तसेच मुरूम टाकून साईट पट्टी भरण्यात आल्या आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जुना मुंबई पुणे हायवे दोन्ही दिशेला स्पीड कमी करण्याकरिता आवश्यकतेनुसार पांढऱ्या रंगाचे थर्मल रमलर्स पट्टे, पादचाऱ्यांना रोड क्रॉस करण्याकरिता झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्यात आले आहेत, आणि ब्लींकर दुरुस्त व बदलण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रॉस करून तळेगावात येताना आणि वडगावच्या दिशेने जाण्याकरिता केलेल्या उपायोजनांमुळे वाहन चालकांना सुरळीत प्रवास करता येत असून अपघात प्रतिबंध होण्याकरिता याचा उपयोग होत आहे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली.
सदर उपयोजनाकरिता तळेगाव वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गजमल, एमएसआरटीसी चे डेप्युटी इंजिनिअर श्रीमती प्रेरणा कोटकर यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. लिंब फाटा या ठिकाणी तळेगाव ट्राफिक डिव्हिजनचे ट्राफिक अंमलदार आणि ट्राफिक सहाय्यक यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर ठिकाणी तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांच्यामार्फतीने हायमास दिवे लावण्याकरिता पाठपुरावा केला आहे.
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 73 कोटी 60 लाख रुपये नुकसान भरपाई, मावळमधील 114 शेतकऱ्यांचा समावेश
– अर्ध्या कड्यावर बॉडी आली आणि रोपचा गुंता झाला; लायन्स पॉइंट येथील बॉडी रेस्क्यूचा थरार!! शिवदुर्गच्या अथक प्रयत्नांना सलाम