क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुळशी तालुक्यातील सुस येथील ध्रुव ग्लोबल स्कूल इथे ही स्पर्धा पार पडली. ह्या जिल्हा स्तरावरील योगासन स्पर्धेत मावळ तालुक्यातील कुमारी समृध्दी उल्हास पाळेकर हिने प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल) पटकावले आहे. ( Samriddhi Pallekar from Maval taluka won gold medal in Pune district level school yoga competition )
ह्या यशासह समृद्धी हिची विभागीय योगासन स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. व्हि. पी. एस. हायस्कुल आणि द. पु. मेहता कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य महिंन्द्रकर (सर) उपप्राचार्य दहिफळे (सर) क्रीडा शिक्षक रेवती बोके यांनी या यशाबद्दल समृद्धीचे अभिनंदन केले. तसेच पुढील विभागीय योगासन स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याचे आमदार सुनिल शेळके यांचे आदेश
– नागाथली येथील ‘त्या’ बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ! झऱ्याखाली जखमी होऊन मृत्यू झाल्याचा अंदाज
– शेतकऱ्यांनी तत्काळ ई-पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन, ‘ही’ आहे अंतिम तारिख