वडगाव शहरातील लहान मुला-मुलींसाठी साई गार्डन रेसिडेन्सी येथील मोरया स्कूलमध्ये वय वर्षे 3 ते 15 वर्षांच्या आतील मुला-मुलींसाठी दररोज सायंकाळी 5 ते 6 या वेळेत अत्यंत अल्पदरात संस्कार वर्ग सुरू करण्यात आले आहेत. वडगाव शहराचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांची कन्या कु. नारायणी ढोरे हिच्या वाढदिवसानिमित्त मोरया महिला प्रतिष्ठान च्या संकल्पनेतून वडगावमधील लहान मुलांसाठी हा खास उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ( Sanskar Varg Started For Children Through Morya Mahila Pratishthan In Vadgaon Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शुक्रवारपासून (दिनांक 24 फेब्रुवारी) सुरू झालेल्या या संस्कार वर्गात विविध भागातील पालकांनी आपल्या पाल्यांची नाव नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. या संस्कार वर्गात भगवद्गीता 15 वा अध्याय, राम रक्षा, हनुमान चालीसा, त्रिकाळ संध्या, पसायदान, मनाचे श्लोक, मारुती स्तोत्र, अथर्वशीर्ष, सूर्यनमस्कार, प्राणायाम याव्यतिरिक्त वारकरी संप्रदायातील अध्यात्मिक ज्ञानाचे धडे मुलांना दिले जाणार आहे.
पूर्वी शाळेमध्ये प्रार्थना, श्लोक, सुविचार, पसायदान, स्तोत्र यांचे वाचन व्हायचे आणि मुलांच्या मनावर न सांगताही या गोष्टी रुजल्या जायच्या. परंतू आता ही परंपरा कुठेतरी खंडीत होत चालली आहे. आता भाषा बदलली, माणसेही बदलली. त्यामुळे लहान मुले संस्कृती, परंपरा विसरत चालल्याचे दिसत आहे. म्हणूनच आजच्या मोबाईलच्या युगात मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार आणि संस्कृती याची शिकवणही देणे खूप गरजेचे आहे. हाच दूरगामी विचार लक्षात घेऊन हे संस्कार वर्ग सुरू करण्यात येत असून या माध्यमातून आपली संस्कृती आपणच जपायला हवी, अशी अपेक्षा मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्ष अबोली ढोरे यांनी व्यक्त केली.
नाव नोंदणी सुरू. संपर्क – सुषमा जाजू 8668805190
अधिक वाचा –
– फुफ्फुसात दुर्मिळ गाठ असणाऱ्या तरुणावर यशस्वी उपचार; तळेगावमधील टीजीएच-ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये शस्त्रक्रिया
– मोठी बातमी! औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्र सरकारची मंजूरी, शिंदे-फडणवीस सरकारला मोठे यश