सातारा लोकसभेचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी आणि सारंग पाटील यांच्या मातोश्री रजनी देवी श्रीनिवास पाटील (वय 76) यांचे आज, शुक्रवार (दि. 12 जानेवारी) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. शुक्रवारी दुपारी त्यांची प्रकृती खालावली होती, त्यातच उपचारादरम्यान दुपारी दीडच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सौ रजनीदेवी पाटील यांचा जन्म 26 जुलै 1968 रोजी जन्म झाला. त्यांचे मूळ गाव सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील असून चार पिढ्यांची सैनिकी परंपरा असलेल्या बर्गे कुटुंबातील आहे. 16 मे 1968 रोजी त्यांचा खा. श्रीनिवास पाटील यांच्याशी विवाह झाला. श्रीनिवास पाटील यांच्या प्रशासकीय, राजकीय व सामाजिक जीवनात त्यांनी कायम सोबत दिली. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 6 वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ( Satara NCP MP Srinivas Patil Wife Rajni Devi Passes Away at Pune )
राजकीय क्षेत्रातून श्रद्धांजलीचा महापूर –
आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब ( @ShriPatilKarad) यांच्या पत्नी रजनीदेवी(काकी) पाटील यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. श्रीनिवास काका हे आदरणीय पवार साहेबांचे जवळचे मित्र व अत्यंत विश्वासू सहकारी. आमच्या दोन्ही कुटुंबांतील संबंध खुप जवळचे आहेत. पाटील साहेबांच्या… pic.twitter.com/uwgIoSRBM2
— Supriya Sule (@supriya_sule) January 12, 2024
आजचा दिवस वाईट आहे. साताऱ्याचे खासदार श्री.श्रीनिवास पाटील यांच्या सहचरणी सौ.रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय 76) यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले.पाटील साहेब आणि त्यांच्या परिजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली…! pic.twitter.com/VUWRWUuK7v— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 12, 2024
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अर्धांगिनी सौ. रजनीदेवी यांच्या निधनाची बातमी दुःखदायक आहे. खासदार पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखातून सावरण्याची ताकद ईश्वराने त्यांना द्यावी, हीच प्रार्थना. सौ. रजनीदेवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/AXBMwa6FkA
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) January 12, 2024
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. श्रीनिवास पाटील साहेब यांना सावलीप्रमाणे साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी रजनीदेवी (७६) यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/NIxfV9tWOc— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 12, 2024
सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय श्रीनिवास पाटील जी यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील (माई) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना #भावपूर्ण_श्रद्धांजली! आम्ही सर्वजण पाटील कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, ही प्रार्थना! pic.twitter.com/OKZu5fmny1
— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) January 12, 2024
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील महसूल मंडळांची पुनर्रचना, 5 नव्या मंडळांची निर्मिती; तुमचे गाव कोणत्या मंडळात? पाहा संपूर्ण यादी । Maval News
– लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद! विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेल रोको आंदोलन, डेक्कन क्विन रोखल्याने रेल्वे प्रशासनाची धावपळ । Lonavala Railway Movement
– सॉल्लिड कामगिरी! कामशेत पोलिसांकडून गहाळ झालेल्या 19 मोबाईलचा शोध, थेट कर्नाटकातून हस्तगत केले फोन । Maval Crime