मावळ तालुक्यातील बुधवडी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. समस्थ ग्रामस्थ मंडळी बुधवडी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे जंगी नियोजन करण्यात आले होते. गावातील शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत आणि सहभागातून बुधवडी येथे सोमवारी (दि. 19) मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी झाली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
पहाटे चार वाजता किल्ले लोहगड येथून गावातील शिवभक्त तरुणांनी शिवज्योत गावात आणली. गावातील सुवासिनींनी ज्योतीचे स्वागत केले. त्यानंतर शिवज्योत आणि शिवप्रतिमेचे पूजन झाले व सामुहिक शिववंदना आणि महाआरती घेण्यात आली. यावेळी गावातील सर्व शिवभक्त नागरिक, महिला-पुरुष, बालके मोठ्या हिरहिरीने सहभागी झाले होते. त्यानंतर श्रींचा महाअभिषेक करण्यात आला. (Shiv Jayanti 2024 Celebrated With Eenthusiasm In Budhwadi Billage Of Maval Taluka)
सायंकाळी 4 चे 6 या वेळेत शिवप्रतिमेची सजवलेल्या पालखीतून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक पद्धतीने काढण्यात आलेल्या या पालखी मिरवणूकीत गावकऱ्यांचा एकोपा आणि उत्साह दिसून आला. त्यानंतर लहान मुलांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. लहानग्यांच्या कलेला उपस्थितांनी चांगली दाद दिली.
पुढे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेले पुणे जिल्ह्यातील प्रतिद्ध शिवव्याख्याते ह.भ.प. दत्तात्रय महाराज माशेरे यांचे शिवव्याख्यान झाले. शिवचरित्रातील प्रसंग ऐकताना उपस्थितांच्या अंगावर शहारे आले होते. शिवव्याख्यानासाठी पंचक्रोशीतील शिवभक्त उपस्थित झाले होते. अखेरीस महाप्रसादाने शिवजन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाले. संपूर्ण बुधवडी ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.
अधिक वाचा –
– मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा निर्णय घेतलाय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । Maratha Reservation Bill
– पवन मावळमधील शिळींब गावात शिवजयंती जल्लोषात साजरी; विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तनासाठी पंचक्रोशीतील शिवभक्तांची हजेरी
– कात्रजमधून अपहरण केलेल्या तरुणाची लोणावळ्यातून सुटका, खंडणीसाठी केले होते अपहरण । Pune News