Dainik Maval News : ताजे येथील ताजुबाई बाल भजन मंडळ आणि भाऊ चिंधू केदारी मित्र मंडळ यांच्या वतीने राज्यस्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पुणे येथील ज्ञानोबा संगीत भजनी मंडळ आणि डोंबिवली येथील आई एकविरा महिला भजनी मंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज यांच्या हस्ते करण्यात आले होते.
सदर भजन स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, रायगड, ठाणे, मुंबई, कोल्हापूर, पुणे येथील जवळपास ५७ मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यात, ज्ञानोबा संगीत भजनी मंडळ, पुणे आणि आई एकविरा महिला भजनी मंडळ, डोंबिवली यांनी प्रथम क्रमांक, कोळंबा भजनी मंडळ, भांडुप आणि माऊली भजनी मंडळ, भोसरी यांनी द्वितीय क्रमांक, ओम साई महिला भजनी मंडळ, खालापूर आणि श्री काळभैरवनाथ भजनी मंडळ, सुधागड यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
भजन स्पर्धेचे नियोजन भाऊ केदारी, मुकुंद भोसले, निळू भाऊ, तानाजी तावरे, उद्धव केदारी, रमेश केदारी, संभाजी केदारी, प्रदीप केदारी, अंकुश केदारी, यश केदारी, चिंधु केदारी, अंजली कडू, संदीप वाळुंज, मच्छिंद्र केदारी, सचिन बोके, विकास सातकर, पांडूरंग कोंडभर, विकास वाल्हेकर, विजय तिकोने यांच्यासह ताजे ग्रामस्थांनी केले होते.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.१० टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, १२ कॉलेजचा निकाल शंभर टक्के । Maharashtra HSC 12th Result 2025
– ‘दैनिक मावळ’ संवाद : ज्येष्ठ नाट्यकलाकार व नाट्यप्रशिक्षक प्रकाश पारखी यांच्याशी खास बातचीत । Drama instructor Prakash Parkhi
– पुणे-लोणावळा तिसर्या-चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने पुढे जाणार, रेल्वेकडून डीपीआर तयार ; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती