व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 6, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेऊ’ मोहिमेला राज्यभरात सुरूवात

ही मोहीम १ मे ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 6, 2025
in महाराष्ट्र
Fill the compost pit keep your village clean campaign launched across maharashtra

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यातील ग्रामीण भागात वैयक्तिक स्वच्छतेसोबतच शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे तसेच गावात दृश्यमान शाश्वत स्वच्छता राखणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामीण भागातील स्वच्छतेला अधिक गतीमान करण्यासाठी लोकसहभागावर भर दिला आहे. सार्वजनिक व घरगुती स्तरावरील घनकचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्याचा एक भाग म्हणून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत ‘कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेऊ’ या मोहिमेची ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

ही मोहीम १ मे ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, बचतगट, युवक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

  • राज्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा- २ अंतर्गत वैयक्तिक शौचालय व सार्वजनिक शौचालयांसह घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मैलागाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, गोबरधन या घटकांची कामे प्रगतीपथावर आहेत. राज्याच्या ग्रामीण भागात स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहिल्यास या कामांना अधिक गती प्राप्त होईल. सर्व गावे हागणदारीमुक्त अधिक मॉडेल म्हणून घोषित करून संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करण्याचा शासनाचा संकल्प आहे.

अभियानाची उद्दिष्टे :
गावांची संपूर्ण स्वच्छता करण्याबरोबरच ग्रामीण भागातील सर्व गावांना दृश्यमान स्वच्छतेचा अपेक्षित दर्जा मिळवून ग्रामीण जनतेत स्वच्छतेविषयक वर्तणूकीत बदल घडवून आणणे, सेंद्रीय कचऱ्याचे व्यवस्थापन करून वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे. घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी कचरा कमी करणे, पुनर्वापर करणे. यावर भर देणे.

मोहीम अंमलबजावणी कालावधीचे टप्पे :
1. अभियान कालावधी ०१ मे २०२५ ते १५ सप्टेंबर २०२५ असा असून याचा
2. आरंभ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उद्या दि. १ मे रोजी करण्यात येणार आहे
3. गावातून कचरा जमा करून नाडेप भरण्याचा कालावधी १ मे ते १० मे २०२५ असा आहे
4. प्रक्रिया, देखभाल व पडताळणी कालावधी ११ मे २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ असा आहे
5. नाडेप खड्डा उपसणे दि. ०१ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२५ असा आहे

लोकप्रतिनिधींचाही सक्रीय सहभाग
राज्यात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता ग्रामस्थांप्रमाणे लोकप्रतिनिधी यांचाही सक्रिय सहभाग असणार आहे. सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, सरपंच यांना पाणीपुरवठा मंत्री पाटील, यांनी पत्राद्वारे मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. संबंधित लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघात जाऊन मोहिमेचा आरंभ करणार आहेत.

मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.), गटविकास अधिकारी, यांच्यावर मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

गावपातळीवर मोहिमेत यांचा असेल सहभाग
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व अधिकारी/सल्लागार, विस्तार अधिकारी (सर्व), अन्य कर्मचारी, प्रत्येक ग्राम पंचायतीतील ग्राम सेवक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, ग्राम पंचायत स्तरावरील सर्व कर्मचारी तसेच ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, सर्व महिला बचत गट यांचा सहभाग असेल.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.१० टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, १२ कॉलेजचा निकाल शंभर टक्के । Maharashtra HSC 12th Result 2025
– ‘दैनिक मावळ’ संवाद : ज्येष्ठ नाट्यकलाकार व नाट्यप्रशिक्षक प्रकाश पारखी यांच्याशी खास बातचीत । Drama instructor Prakash Parkhi
– पुणे-लोणावळा तिसर्‍या-चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने पुढे जाणार, रेल्वेकडून डीपीआर तयार ; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती 


dainik maval ads may 2025

Previous Post

ताजे येथील राज्यस्तरीय भजन स्पर्धेत ज्ञानोबा संगीत भजनी मंडळ आणि आई एकविरा महिला भजनी मंडळ प्रथम । Karla News

Next Post

धक्कादायक ! पवन मावळातील शिळींब-चावसर रस्त्यालगत अज्ञात व्यक्तीचा पुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

धक्कादायक ! पवन मावळातील शिळींब-चावसर रस्त्यालगत अज्ञात व्यक्तीचा पुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval-Taluka

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा । Pawana Dam Updates

July 5, 2025
Maval Bhushan MLA Late Krishnarao Bhegde condolence meeting

मावळभूषण आमदार स्व. कृष्णराव भेगडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन

July 5, 2025
Devshayani-Ashadhi-Ekadashi

आषाढी एकादशीनिमित्त रविवारी वडगाव शहरातील मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याची मागणी । Vadgaon Maval

July 5, 2025
Wildlife conservationist Maval organization saves injured monkey from Jambhul Phata Maval

जांभूळ फाटा येथे जखमी वानरास वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान । Maval News

July 4, 2025
Big News Conspiracy to murder MLA Sunil Shelke exposed SIT formed

खळबळजनक! आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट, चौकशीसाठी ‘एसआयटी’ची स्थापना, गृह राज्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

July 4, 2025
High Security Registration Number Plate

महत्वाची बातमी ! जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसविण्यासाठी १५ ऑगस्ट ही अंतिम मुदत

July 4, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.