Dainik Maval News : कोतवालांचा शासनाच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यात समावेश व्हावा, या मागणीसाठी 24 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करणार आहे. त्यामध्ये मावळ तालुका कोतवाल संघटना सहभागी होणार आहे. तसेच दिनांक 25 सप्टेंबर रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय काम बंद आंदोलन करणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तरीही मागणी मान्य न झाल्यास 26 सप्टेंबरपासून मुंबई येथे आजाद मैदानावर ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन करणार आहे. यामध्ये मावळ तालुका कोतवाल संघटना सहभागी होणार आहे. संदर्भातील लेखी निवेदन मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना दिले यावेळी मावळ तालुका कोतवाल संघटनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ कालेकर, उपाध्यक्ष विठ्ठल पाठारे,सचिव प्रदीप राऊत, खजिनदार चंद्रकांत तळपे, संभाजी कुटे यांच्यासह संघटनेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
रेकार्ड विभाग राहणार बंद –
मावळ तालुक्यातील महसूल दप्तरी विभाग बंद असल्याने नागरीकांची गैरसोय होणार आहे दैनंदिन कामासाठी लागणारे कागदपत्रे घेण्यासाठी नागरिकांना बहुसंख्येने येत असतात तसेच तलाठी कार्यालयात विवीध कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना बंदचा फटका बसणार आहे.
अधिक वाचा –
– धक्कादायक ! पैशांच्या उधारीवरून झालेल्या वादातून तरुणाचा खून, तळेगाव एमआयडीसी हद्दीतील घटना । Talegaon Crime
– शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण, जांभवडे परिसरातील घटना । Maval Crime
– विजेच्या लपंडावामुळे त्रस्त टाकवे बुद्रुकचे ग्रामस्थ ; महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा । Maval News
