व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुढच्या पावसाळ्याच्या आत राजमाचीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण करणार, आमदार शेळकेंचा ग्रामस्थांना शब्द । Maval News

राजमाची गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम पुढील पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचा मानस आमदार सुनील शेळके यांनी बोलून दाखविला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 25, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहराच्या लगत असलेले मात्र आजपर्यंत विकासापासून वंचित राहिलेल्या राजमाची गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम पुढील पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचा मानस आमदार सुनील शेळके यांनी बोलून दाखविला. या रस्त्याकरिता आदिवासी विभागाकडून चार कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करून घेण्यात आला आहे. मात्र सदरचा रस्ता हा वनविभागाच्या जागेतून जात असल्याने त्यांची परवानगी महत्वाची आहे. याकरिता नागपूर व मंत्रालय या दोन ठिकाणी पाठपुरावा करीत पुढील सहा ते आठ महिन्यांमध्ये सदर रस्त्याचे काम करून घेण्याचा शब्द मी तेथील ग्रामस्थांना दिला असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

लोणावळा शहरापासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर राजमाची हे गाव आहे. देश स्वतंत्र होऊन 77 वर्षे झाली मात्र आजही या गावांमध्ये वीज नाही, पिण्याचे पाणी नाही. तसेच गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता देखील नाही. अनेक सरकारी आली व गेली, अनेक आमदार या मावळ तालुक्याने पाहिले. मात्र कोणीही राजमाची गावातील मूलभूत समस्या सोडविण्याकडे लक्ष दिले नव्हते. वनविभागाच्या अखत्यारीमध्ये राजमाची गाव व सर्व परिसर असल्याने विकास कामे करण्यात अडचणी येतात, हे निश्चित असले तरी त्यावर मार्ग काढत तो तडीस नेण्याचा प्रयत्न आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे. यापूर्वी माजी आमदार बाळा भेगडे यांनी रस्त्यावर काही साकव पुल उभारले होते.

  • आमदार सुनील शेळके म्हणाले, राजमाची गाव हे अतिशय दुर्गम ठिकाणी आहे. मागील पाच वर्षात मी दोन वेळा या गावाला भेट दिली. त्या ठिकाणी सध्या अंतर्गत रस्त्याची कामे सुरू असून पाण्याची टाकी देखील उभी राहिली आहे. गावामध्ये पाईपलाईन फिरवण्याचे काम सुरू असून पुढील दीड ते दोन महिन्यांमध्ये नळाद्वारे पाणी सुरू होईल. मंदिरासमोरील सभा मंडपाची मागणी करण्यात आली होती, ते काम देखील करून देण्यात आले आहे.

याठिकाणी अद्यापपर्यंत लाईट पोहोचलेली नाही. लाईट पोचविण्यासाठी साधारणतः सात ते आठ कोटी रुपयांचा खर्च अंदाजीत करण्यात आला आहे. मात्र तेवढे बजेट मावळ तालुक्याचे नसल्याने दोन टप्प्यांमध्ये सदरचे काम करण्याचे सूचित करण्यात आले आहे. येत्या काळामध्ये तेथील विजेची समस्या देखील सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्या ठिकाणी पूर्वी काही संस्थांनी सोलर पॅनल द्वारे लाईट लावली होती. मात्र जोरदार वारा व पाऊस यामुळे त्या ठिकाणी ते टिकत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याकरिता विजेचे खांब टाकत त्या ठिकाणापर्यंत टप्प्याटप्प्याने वीज घेऊन जाण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा –
– धक्कादायक ! पैशांच्या उधारीवरून झालेल्या वादातून तरुणाचा खून, तळेगाव एमआयडीसी हद्दीतील घटना । Talegaon Crime
– शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण, जांभवडे परिसरातील घटना । Maval Crime
– विजेच्या लपंडावामुळे त्रस्त टाकवे बुद्रुकचे ग्रामस्थ ; महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव शहरातील विकासकामांची चौकशी करा ; फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन । Talegaon Dabhade

Next Post

राज्यव्यापी काम बंद आंदोलनात सहभागी होण्यासाठी मावळ तालुका कोतवाल संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Taluka Kotwal Association

राज्यव्यापी काम बंद आंदोलनात सहभागी होण्यासाठी मावळ तालुका कोतवाल संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.